वसई- नालासोपारा येथे भर रस्त्यात एक तरुण नंग्या तलावारीने लोकांमध्ये दहशत माजवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची चित्रफित वायरल झाल्याने पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल करून या तरुणाचा शोध सुरू केला आहे. पुण्यामध्ये कोयता घेऊन दहशत माजवून हल्ला करणारी कोयता गँग सक्रीय असताना वसईत तलवार गॅग सक्रीय झाली आहे.
हेही वाचा >>> वसई: डिश अँटेना सरळ करताना तोल गेला, गच्चीवरून पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन येथे एक तरुण नंगी तलवार घेऊन दहशत माजवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवार रात्रीची ही घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा तरुणा तलवार दाखवून परिसरातील लोकांना धमकावत असल्याचे चित्रफितीत दिसून येत आहे. ही चित्रफित वायरल झाल्यानंतर पेल्हार पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. या चित्रफितीतीत असेलल्या दोघांची ओळख पटली आहे. त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तलवार घेऊन दहशत माजविणार्या तरुणाचा शोध सुरू असून पोलीस पथके त्याच्या अटकेसाठी रवाना करण्यात आली आहे. त्याने कुणावर हल्ला केलेला नाही. मात्र हा प्रकार गंभीर असल्याचे पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी सांगितले.