वसई–  घराच्या मालकीवरून झालेल्या वादातून सख्ख्या वहिनीची हत्या करणार्‍या दिराला वसई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०१८ मध्ये विरार मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सादर केलेले भक्कम पुरावे, साक्षीदारांची साक्ष महत्वपूर्ण मानून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.

विरार पूर्वेच्या आंबेडकर नगर मधील अण्णा पाडा येथे शशिकांत गुंडाळे उर्फ कांबळे (३६)  हा पत्नी आरती (३२) हिच्या सोबत रहात होता. ते घर त्याची आई लक्ष्मी हिच्या नावाने होते. घराच्या मालकीवरून शशिकांत आणि त्याचा भाऊ श्रीकांत गुंडाळे यांच्यात वाद झाला होता. आई लक्ष्मीच्या मृत्यूनंतर श्रीकांतने परस्पर घर स्वत:च्या नावाने करून घेतले होते आणि ते विकण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याला शशिकांत आणि त्याची पत्नी आरती विरोध करत होते.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
Hyderabad Man Shoots At Girlfriend Father With Air Gun accused arrested
प्रेयसीला अमेरिकेला पाठवलं म्हणून संतापलेल्या प्रियकराने तिच्या वडिलांवर केला गोळीबार; कुठे घडली घटना?

हेही वाचा >>> माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्यावर गुन्हा, भाजपाचे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन

यामुळे ११ जून २०१८ रोजी श्रीकांत गुंडाळे याने वहिनी आरती कांबळे हीची चाकूने वार करून हत्या केली होती. जीव वाचविण्यासाठी आरती रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर धावत आली होती आणि तेथेच कोसळली होती.

या हत्ये प्रकरणात विरार पोलिसांनी श्रीकांतला अटक केली होती. त्याच्या विरोधात वसई सत्र न्यायालायत हत्या प्रकणाचा खटला सुरू होता. विरार पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांच्या पथकाने सखोल तपास करून भक्कम पुरावे गोळा केले होते. न्यायालयात हे पुरावे सादर करण्यात आले. वसई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.डी. देशपांडे यांनी याप्रकरणी श्रीकांत कांबळे याला दोषी ठरवून जन्मठेप आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा >>> प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वसई-भाईंदर रो-रो सेवेसाठी दुसरी नौकाही तैनात, सुट्टीच्या दिवशी दर २० मिनिटाला सेवा

हत्या पूर्वनियोजित, भक्कम पुरावे

श्रीकांत याने केलेली हत्या पूर्वनियोजित होती. यापू्वी देखील त्याने भावाला आणि वहिनीला मारण्याची धमकी दिली होती. तशी तक्रार विरार पोलीस ठाण्यात होती. पालिकेतून त्याने खोटे दस्तावेज तयार करून घर नावावर केले होते. पोलिसांनी हे सर्व पुरावे गोळा केले. याशिवाय १० साक्षीदार तयार केले होते. त्यामुळे न्यायालयात सरकारी वकिलांची बाजू भक्कम झाली होती. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करताना वस्तुनिष्ट पुराव्यांवर भर दिला होता. त्यामुळे आरोपी विरोधातील गुन्हा सिध्द होऊ शकला आणि मयत महिलेच्या कुटुंबियांना न्याय देऊ शकलो, असे आढाव यांनी सांगितले. ते सध्या कणकवली येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. विरार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी या मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक सी आर पाटील, हवालदार सुर्यवंशी, पोलीस नाईक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक कुंडगीर, लहुबंदे, शिवाजी बुरकूल यांनी तपास कामात महत्वाची भूमिका बजावली. सरकारी वकील म्हणून नजरीन मुल्ला यांनी काम पाहिले.