पालघरमधल्या नालासोपारा या ठिकाणी घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. आकाश विठ्ठल सकपाळ असं बलात्कार करणाऱ्या इसमाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आकाश सकपाळ आणि पीडित महिला हे नालासोपारा या ठिकाणी शेजारी राहतात. तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. महिलेचं लग्न झालेलं असून ती तिच्या पतीसह आरोपीच्या घराशेजारी राहते.

घर दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार

तीन वर्षांच्या ओळखीच्या फायदा घेत आकाशने पीडित महिलेला घर दाखवण्यासाठी नेलं. तिथे तिच्यावर एकाहून जास्तवेळा बलात्कार केला आणि तिचे अश्लील फोटोही काढले. याबाबत कुठे काही बोलशील तर तुझ्या नवऱ्याला ठार करेन आणि तुझे फोटो व्हायरल करेन अशी धमकीही आकाशने तिला दिली होती. आता पोलिसांनी आकाशला अटक केली आहे. ANI ने याविषयीचे वृत्त दिले आहे.

cbi arrests rg kar ex principal and psi
कोलकाता बलात्कार प्रकरणी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यासह पोलीस निरीक्षकाला अटक; पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vinesh Phogat Allegations on PT Usha Senior Lawyer Harish Salve Gives Statement
Vinesh Phogat: विनेश फोगटचे पीटी उषा यांच्यावरील आरोप खोटे? वकिल हरिश साळवे यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
father of rape victim change birth record to save accused
Jaipur Crime News : बाप नव्हे हैवान! बलात्कारी आरोपीला वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलीची बदलली जन्मतारीख
Rape in Uttarpradesh
Rape in UP : रात्री शौचास गेली अन् शाळेतील शिपायांनी रोखलं; १३ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उजेडात!
A nine year old girl was sexually assaulted by her father in malad mumbai news
sexually assaulted case: नऊ वर्षांच्या मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
kidnap, girl, kidnap attempt thane,
ठाण्यात अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपी आकाशने महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर तिच्या नवऱ्याला ठार करण्याची आणि तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली. पीडित महिलेने हा सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर हे दोघेही पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी आकाशच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरुन गुन्हा नोंदवल्यानंतर आकाशला अटक करण्यात आली. त्याला पोलिसांनी कोर्टात हजर केलं होतं. कोर्टाने आकाशची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.