प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विरार : १२ मार्च १९९३ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी साखळी बॉम्बस्फोटाच्या आठवणी आता काहीशा पुसत चालल्या असल्या तरी २९ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतरही यातील जखमी, मृतांचे नातेवाईक यांच्या वेदना मात्र अजूनही तशाच आहेत. आजही सरकारच्या नाकर्तेपणामुळे यातील जखमींना २९ वर्षे उलटूनही अनुदान मिळाले नाही. अनेकांनी हा लढा सोडला, पण मुंबईचे कीर्ती अजमेरा मात्र आजही सरकारशी यासाठी लढा देत आहेत.
साखळी बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली होती. एकापाठोपाठ १२ ठिकाणी हे स्फोट घडविण्यात आले होते. यातील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे समोरील झालेल्या स्फोटात मुंबई माहीम येथे राहणारे कीर्ती अजमेरा जखमी झाले होते. त्यांच्या शरीराच्या उजव्या भागात जखमा झाल्या होत्या. त्यांच्या संपूर्ण शरीरात असंख्य काचा घुसल्या होत्या. आज २९ वर्षांनंतरही यांच्या शरीरातून काचा निघतात. अजमेरा यांच्यावर आतापर्यंत ४० हून अधिक शत्रक्रिया झाल्या आहेत. आणि अजून काही व्हायच्या आहेत. आतापर्यंत त्यांनी ४० लाखांच्यावर खर्च करून जगण्याची शर्यत जिंकली आहे. पण अजूनही सरकारचे अनुदान त्यांच्या पदरी पडले नाही. यावेळी सरकारने मयतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना २५ हजार रुपये अनुदान देण्याचे घोषित केले होते. पण अजूनही अनेकांना याचे पैसे मिळाले नाहीत.
या हल्ल्यात अनेक जखमींना कायमचे अपंगत्व आले, काहींच्या शरीराचे ठरावीक अवयव निकामी झाले, तर काहीजन कालांतराने दगावले. पण या हल्ल्यात सापडलेल्या सर्वाचेच या घटनेने जीवनच बदलून टाकले. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी अजमेरा ही दुपारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इमारतीत जाताना रस्त्यावर हा स्फोट झाला आणि त्यात ते जखमी झाले. त्यावेळी त्यांचे वय केवळ ३६ वर्षांचे होते आणि आज ते ६३ वर्षांचे आहेत. अजमेरा केवळ आपल्यासाठी लढत नसून त्या १४०० लोकांसाठी लढा देत आहेत. ज्यांच्या आयुष्यात हा काळा दिवस कायमचा कोरला आहे. आताचे सरकार त्यांना न्याय देईल या प्रतीक्षेत अजूनही शरीरावरील जखमांचा सामना करत ते लढत आहेत.
केवळ आश्वासने : अजमेरा यांनी माहिती दिली की, मागील २९ वर्षांच्या काळात त्यांनी सत्तेत असलेल्या सर्व राजकीय दिग्गज मंडळींकडे आपले गाऱ्हाणे मांडले. प्रत्येकांनी केवळ आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही. इतकेच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ गोिवद, यांनासुद्धा पत्रव्यवहार केले. पण कोणतेच उत्तर मिळाले नाही. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला, आयोगाने महाराष्ट्र सरकाला यामध्ये तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. पण ते सुद्धा कागदावरच राहिले. त्यानंतर अजमेरा यांनी प्रसारमाध्यमातून आपली व्यथा मांडली
आजही माझ्या वेदना मला जगू देत नाहीत, अजूनही अनेक शत्रक्रिया करायच्या आहेत. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च आहे. इतके पैसे कसे आणणार? ज्या पद्धतीने माझे जीवन या घटनेनंतर बदलेले असे शेकडो लोक आजही मुंबईत सरकारच्या नाकर्तेपणामुळे नरक यातना भोगत आहेत. त्यांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे
–कीर्ती अजमेरा.