विरार : वसई रेल्वे स्थानकात एका इसमाने आपल्या पत्नीला झोपेतून उठवून  धावत्या रेल्वेखाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत

वसई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर इसम आपली पत्नी आणि दोन मुलांसह रविवारी दुपारी वसई प्लॅटफॉर्म वर आला होता. दिवसभर ते तिथेच थांबले होते. दुपारी त्यांच्यामध्ये भांडण झाली होती. यानंतर सर्वजण फलाटावर झोपले होते.

सोमवारी पहाटे ४.१० मिनिटाने त्याने झोपलेल्या पत्नीला उठवले आणि समोरून येणाऱ्या अवध एक्स्प्रेस खाली तिला ढकलून दिले. तिचा जागीच मृत्यू झाला यानंतर हा इसम आपल्या दोन्ही मुलांना घेऊन फरार झाला. हत्येचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरा कैदे झाला आहे पोलिसांनी या अज्ञात इसमाविरोधात सत्तेचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही वरून त्याचा माग काढला असता तो दादरला आणि तिथून कल्याणला गेल्याचे समोर आले आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची फथके रवाना झाली आहे.

Story img Loader