वसई : वसई-विरारच्या खाडीकिनाऱ्यांवर असलेल्या कांदळवनांची कत्तल, त्यावर माती भराव, अतिक्रमण असे प्रकार सुरू असल्याने वसईतील कांदळवने धोक्यात आली आहेत. महसूल विभागाकडून कांदळवनांची पाहणी केली जाणार आहे. त्यात कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण तसेच कत्तल केल्याचे आढळल्यास दोषींविरोधात अहवाल तयार करून कारवाई केली जाणार आहे.

वसई-विरारमध्ये विविध ठिकाणच्या खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे; परंतु हळूहळू हे क्षेत्र विविध कारणांमुळे कमी होऊ लागले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील पाण्याचा प्रवाह रोखणे, जमिनीची होणारी धूप थांबविणे, सुनामी, चक्रीवादळ आणि पुरापासून संरक्षण करणे, समुद्राचे प्रदूषण कमी करणे, यासाठी कांदळवने उपयोगी ठरत आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मात्र, वसई-विरारमध्ये खाडीकिनारी कांदळवनांच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात मातीचा भराव करून त्यावर बांधकामे करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी कांदळवनांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे कांदळवने नष्ट होऊ लागली आहेत.

Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान
Sessions Judge of Kalyan District accused threw slippers on judge
कल्याण न्यायालयात आरोपीने, न्यायाधिशांचे दिशेने चप्पल भिरकावली

कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांच्या संदर्भात वसईच्या महसूल विभागाकडेही तक्रारी येत आहेत. त्यामुळे महसूल विभाग व कांदळवन विभागामधील अधिकाऱ्यांकडून कांदळवन असलेल्या क्षेत्रांची पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. कांदळवन क्षेत्रात जेथे अतिक्रमण किंवा कत्तल केल्याचे निदर्शनास येईल, त्याचा अहवाल तयार करून कारवाई केली जाणार आहे, असे वसईच्या तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

मारंबळपाडा येथे निसर्ग पर्यटन

कांदळवनांचे संवर्धन यासह स्थानिकांना यातून रोजगारनिर्मिती व्हावी या अनुषंगाने विरार येथील मारंबळपाडा परिसर निसर्ग पर्यटन म्हणून विकसित करण्यात आला आहे. शासनाच्या कांदळवन विभागाच्या ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ याअंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

कारवाईकडे दुर्लक्ष

मागील दोन ते तीन वर्षांत कांदळवनांची कत्तल व अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. २०१६ ते २०१९ या कालावधीत भुईगाव, उमेळे, रानगाव, आगाशी, मालोंडे, ससूनवघर या भागात कांदळवन अतिक्रमण व कत्तलप्रकरणी नऊ गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर एकही कारवाई न झाल्याने वसई-विरार भागात कांदळवनांची कत्तल होत असून विकासाच्या नावाखाली त्यांचा ऱ्हास होत आहे.

कांदळवनांचे संवर्धन गरजेचे

पर्यावरणाच्या व किनारपट्टीच्या दृष्टीने कांदळवने महत्त्वाची आहेत. वसईतील किनारपट्टी व खाडीच्या भागात मोठय़ा प्रमाणात कांदळवने आहेत; परंतु त्यावर होणारे अतिक्रमण व कत्तल यामुळे कांदळवने धोक्यात आली आहेत. या कांदळवनांचे संवर्धन करण्याची गरज आहे.

Story img Loader