वसई : नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोडवरील द्वाराका हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत तीन जण होरपळून जखमी झाले आहेत. आगीची भीषणता अधिक असल्याने मागील दोन तासापासून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन दलाकडून सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नालासोपारा पूर्वेच्या भागात आचोळे रस्त्यावर द्वारका हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी अचानकपणे गॅस गळती होऊन स्फोट घडला. या स्फोटामुळे आगीची तीव्रता अधिक प्रमाणात वाढली होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना व महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. या आगीत तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याशिवाय जे हॉटेल व इमारती अडकून पडलेल्या नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे.

हेही वाचा…अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोनदा प्रसुती; पहिल्या बाळाची केली विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली त्याचे कारण समजले नसून या आगीत पूर्णतः हॉटेल जळून खाक झाले आहे. या पोलीस यंत्रणा, महापालिका , अग्निशमन दल यांच्या मार्फत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive fire at dwarka hotel in nalasopara due three injured psg