वसईच वसई पुर्वेच्या नवघर औद्योगिक वसाहतीमधील एका प्लास्टीक कंपनीला गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भूषण आग लागली. सुमारे दिड तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीच जिवितहानी झाली नसली तरी कंपन्या जळून खाक झाल्याने मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा >>> जंजिरे धारावी किल्याजवळील मैदानात उभारल्या जाणाऱ्या ‘हॅलीपॅड’मुळे वातावरण पेटले

Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Fire At BKC Station
Mumbai Metro : मुंबईतल्या बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, प्रवाशांना काढण्यात आलं बाहेर, अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी
Fire on the third floor of Bhimashankar Society in Hadapsar
हडपसर येथील भीमाशंकर सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावर आग
Rent free office space in Mhada Bhawan to developer in vangani
वांगणीतील विकासकावर ‘म्हाडा’ची कृपादृष्टी?
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही

नवघर पूर्व औद्योगिक वसाहतीत गीता इंडस्ट्रियल इस्टेट मधील छापरिया इंडस्ट्रीज या कोरोगेटिव्ह बॉक्स बनवणारी कंपनी आहे. गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली. त्यानंतर ही आग बाजूला असलेल्या शैलेश इंडस्ट्रियल इस्टेट मधील गॉलॅपसिबल ट्यूब कॉर्पोरेशन या खेळणी व ॲल्युमिनियम कोलॅप्सिबल ट्यूब्स, मल्टीलेयर लॅमिनेटेड ट्यूब्स बनवणाऱ्या कंपनीत पसरली. अवघ्या काही वेळेत काही वेळातच रोद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच नजीकच्या नवघर अग्निशमन उप केंद्राच्या अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आचोळे मुख्य अग्निशमन केंद्र व सनसिटी येथील उपकेंद्रातून ५ पाण्याचे टॅंकर आणि ५ अग्निशमन गाड्याघटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. दुपारी पावणे बाराच्या सुमारास आम्हाला आगीचा कॉल आला. कंपनीने आत शिरायला जागा नव्हती. त्यामुळे आग नियंत्रणात अडचणी आली होती. मात्र सव्वा तासात आगीवर नियंत्रण मिळवले,  असे सनसिटी अग्निशमन केंद्र प्रमुख विशाल शिर्के यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन महापार्टीची रिंगणात; परेश सुकूर घाटाळ यांना उमेदवारी जाहीर

औद्योगिक कचर्‍यामुळे आग लागल्याचा संशय

ही इंडस्ट्रियल इस्टेट राजवली खाडीच्या काठावर असून या ठिकाणी कंपनीचा औद्योगिक कचरा टाकण्यात येतो. बुधवारी देखील या कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली होती .ती आग पूर्ण पणे विझली नसल्यामुळे ही आग पसरून छापरिया इंडस्ट्रीजला लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.