भाईंदर :- मिरा रोड पूर्व येथील ‘वासुदेव हाइट्स ‘या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर इलेक्ट्रिक शॉकसर्किट मुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटना स्थळी तात्काळ अग्निशमन यंत्रनेच्या ६ गाड्या आणि ५० कर्मचारी पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश प्राप्त झाले आहे. सुदैवाने अदयापही कोणत्याही स्वरूपाची जीवित हानी झालेली नाही.
मिरा रोड पूर्व येथील रामदेव पार्क परिसरात वासुदेव हाइट्स ही इमारत आहे. गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ‘इलेक्ट्रिक डक’ला अचानक शॉर्क सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली. अगीची तीव्रता इतकी अधिक होती की यामुळे इमारतीमधील पहिल्या मजल्यावरचे खोली क्रमांक १०१ आणि १०२ हे अवघ्या काही क्षणात जळून खाक झाले. त्यामुळे आग वेगेने पसरत असल्याचे अग्निशमन विभागाच्या निदर्शनास आल्यामुळे घटना स्थळी तात्काळ ६ अग्निशमन गाड्या आणि ५० कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.तो पर्यत आग ही हळूहळू तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरू लागली होती. त्यामुळे अग्निशमन विभागाने पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील इमारतीच्या खिडकीमधील ग्रील कापून नागरिकांना टीटीएल वाहनाच्या मदतीने खाली आणले.
सध्य स्थितीत आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात आले असून साधारण ४० नागरिकांची बचावकार्य करून सुटका करण्यात आली असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.