भाईंदर :-मिरा भाईंदर शहरात जैन धर्मीयांसाठी उभारण्यात येणारे ‘महावीर भवन’ ऐन वेळी महापालिकेने रद्द केले आहे. याबाबत शासनाकडून आलेला निधी अन्य ठिकाणी वळवण्यात आला असून सदर भूखंडावर विकास  हक्क प्रमाणपत्र मोबदल्यात इमारत उभारून ती सर्वांसाठी खुली करणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नालासोपाऱ्यात टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; टँकरचा बेदरकारपणा सुरूच

मिरा रोड येथील सर्वे क्रमांक २४५ आणि ५८० या जागेवरील नागरी सुविधा भूखंडावरील जागेवर ‘महावीर भवन’ उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी शासनाने मूलभूत सोयी सुविधाचा विकास अंतर्गत पालिकेला ५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला होता. १० मार्च २०२३ रोजी  नगररचना विभागाने नकाशे मंजुर करून १८६८.०३ चौ. मी ( तळ अधिक ३ मजले ) इतक्या बांधकामास मंजुरी देखील दिली आहे. २२ एप्रिल २०२३ रोजी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते भवनाची घोषणा करण्यात आली होती.

हेही वाचा >>> वसई : बांधकाम ठेकेदाराच्या हत्येचा उलगडा; जुगाराच्या नादाने केली हत्या

त्यानुसार येत्या ४ सप्टेंबर रोजी या लग्नाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार गीता जैन यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. मात्र १ ऑगस्ट २०२४  रोजी शासन निर्णयानुसार हे काम रद्द करून हा निधी अन्य ठिकाणी वळवण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र मेहता यांना महापालिकेने लेखी पत्राद्वारे दिली आहे. या ठिकाणी विकास हक्क प्रमाणपत्र मोबदल्यात उभी राहणारी  इमारत ही सर्व धर्मीयांसाठी खुली राहणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महावीर भवन उभारण्याचे आमदार गीताचे यांचे स्वप्न तात्पुरते भंग झाले असून  याबाबत जैन समाजामध्ये नाराजीचे वातावरण पसरले  आहे..

“महावीर भवनबाबत शासनाने मंजुर केलेला निधी अन्य ठिकाणी वळवण्यात आला आहे.मात्र सदर ठिकाणी इमारत उभारली जाणार आहे.या वास्तूला अजूनही नाव देण्यात आलेले नाही. लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. ” दीपक खांबित – शहर अभियंता ( मिरा भाईंदर महापालिका )

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mbmc canceled the mahaveer bhawan to be built for jains in mira bhayandar city zws