भाईंदर :- मीरा रोड येथे प्रस्तावित सर्वधर्मीय दफनभूमीला विरोध होऊ लागल्याने अखेर पालिकेने हा निर्णय रद्द केला आहे. या जागेवर उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालिकेने सांगितले. मिरा रोड येथील सर्व क्रमांक २४७ येथे १५ कोटी रुपये खर्चून सर्वधर्मीय दफनभूमी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दफनभूमीची घोषणा झाल्यानंतर या भूखंडाजवळील आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती.यात स्थानिक पातळीवर राजकीय पुढऱ्यांचा हस्तक्षेप  वाढल्याने वातावरण पेटले होते.

हेही वाचा >>> भाईंदर मधील महावीर भवन रद्द करण्याचा निर्णय

Places Of Worship Act 1991 Supreme Court.
Places Of Worship Act : मंदिर-मिशिदींविरोधात ‘तोपर्यंत’ दाखल होणार नाहीत नवे खटले, सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले

सतत नागरिकांकडून विरोध प्रदर्शन केला जात होता. येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचेही जाहीर करण्यात केले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच मतदारसंघात विरोधात वातावरण तयार  होत असल्याचे  लक्षात येता यावर नमती भूमिका घेण्याचा निर्णय आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. सोमवारी दफनभूमीशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सरनाईक यांच्या कार्यालयात भेट दिली होती. याप्रसंगी सरनाईकांसह महापालिका आयुक्त संजय काटकर देखील उपस्थित होते. नागरिकांचा विरोध असल्यास असे कोणतेही काम आपण करणार नसल्याचे सांगत सरनाईकांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती काटकरांकडे केली. यावर नागरिकांच्या भावना लक्षात घेता दफनभूमीचा निर्णय रद्द करत असल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचे तसेच या जागेवर उद्यान उभारणार असल्याची ‘घोषणा आयुक्त काटकर यांनी यावेळी केली.

Story img Loader