भाईंदर :-मिरा भाईंदर महापालिका शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पुरुष सुरक्षा रक्षकांना एका निश्चित अंतरापर्यंतच वावर सुनिश्चित करण्यात आला आहे.याशिवाय शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना नियंत्रण कक्षाशी जोडून त्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर शाळेत लैगिक अत्याचारकानंतर शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मिरा भाईंदर महापालिका प्रशासनाने देखील खबरदारीच्या दुष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वसई: वकील संघटनांचे आंदोलन स्थगित; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन

यात शहरातील पालिकेच्या ३६ शाळांमध्ये आवश्यक सुरक्षा रक्षक मागणी बाबतचा आढावा शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांकडून घेतला आहे.यात मुलींच्या शाळेत केवळ महिला सुरक्षा रक्षक पुरवण्यात आले आहेत. तर मुले-मुली एकत्र असलेल्या शाळेत मुख्याध्यापकांच्या मागणीनुसारच पुरुष सुरक्षा रक्षक तैनात केले जात आहेत.मात्र या सुरक्षा रक्षकांना विद्यार्थ्यांपासून एक सुरक्षित अंतर  ठेवण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय वर्गात,शौचालय परिसरात आणि इमारतीच्या गच्ची भागात या सुरक्षा रक्षकांना जाण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.तर शाळेवर आणि सुरक्षा रक्षकांवर देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत नजर ठेवली जाणार असल्याची माहिती उपायुक्त संजय दोंदे यांनी दिली आहे आहे.

हेही वाचा >>> वसई: भाजप कार्यकर्त्याला मारहाण, बविआच्या दोघांना अटक

सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण कक्षाला जोडणार

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या एकूण ३६ शाळेत प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे उभारले आहेत.आता या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना भाईंदर पश्चिम येथील उड्डाणपूलाखालील नियंत्रण कक्षाला जोडण्याचे आदेश आयुक्त संजय काटकर यांनी दिली आहे.यामुळे नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांकडून देखील शाळांवर नजर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.त्यानुसार ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने या नियंत्रण कक्षाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mbmc issue guidelines for security guards in mira bhayandar municipal school zws