वसई- मुलाची छतावर अडकलेली भिंगरी काढण्यासाठी इसमाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. रविवारी दुपारी नायगाव पुर्वेच्या पोमण येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रवींद्र भोईर (३५) यांचा मुलगा घरासमोर भिंगरी खेळत होती. ती भिंगरी समोरील घराच्या छतावरील पत्र्यावर अडकवी. ती काढण्यासाठी रवींद्र छतावर चढला होता. मात्र तेथे वीजेचा धक्का लागून तो खाली कोसळला. त्याला उपचारासाठी नालासोपारा येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री अकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत रवींद्र भोईर याच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून नायगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.