भाईंदर :- मिरा भाईंदर शहरात विविध भाषिक मतदारांना आकर्षिक करण्यासाठी राजकीय पक्षांनी राजस्थान, उत्तराखंड  आणि केरळ राज्यातील दिग्गज नेत्यांना शहरात आणले होते. रोड शो, जाहीर सभा तसेच मतदारांना घरोघरी भेटी देऊन रविवारच्या सुट्टीचा दिवशी जोरदार प्रचार करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी थंडावणार आहेत. त्यामुळे आता काही अवघे तास शिल्लक राहिल्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार प्रयत्न करत आहेत. शहरातील विविध भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तराखंड, राजस्थान, केरळ, गुजराथ आदी राज्यातील मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, मंत्री यांनी शहरात हजेरी लावली होती.

jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा

हेही वाचा >>>मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त

महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारासाठी रविवारी रविवारी केरळचे मंत्री सुरेश गोपी यांनी मिरा रोड येथे मतदारांच्या घरोघरी भेट देऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. याशिवाय उत्तराखंडचे  मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी सप्तेश्वर मंदिराला भेट देऊन  मतदारांना भावनिक हाक घातली. शनिवारी देखील राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची जाहीर सभा भाईंदर मघ्ये पार पडली. महाविकास आघाडीतर्फे देखील मारवाडी मतदारांना आकर्षित करण्यासाठी रविवारी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होेते. अपक्ष आमदार गीता जैन यांनी संध्याकाळी जननिर्धार सभा आयोजित केली होती.

या मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे नरेंद्र मेहता, महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसचे मुझफ्फर हुसेन तसेच आमदार गीता जैन अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.