भाईंदर :- मिरा भाईंदर शहरात विविध भाषिक मतदारांना आकर्षिक करण्यासाठी राजकीय पक्षांनी राजस्थान, उत्तराखंड आणि केरळ राज्यातील दिग्गज नेत्यांना शहरात आणले होते. रोड शो, जाहीर सभा तसेच मतदारांना घरोघरी भेटी देऊन रविवारच्या सुट्टीचा दिवशी जोरदार प्रचार करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी थंडावणार आहेत. त्यामुळे आता काही अवघे तास शिल्लक राहिल्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार प्रयत्न करत आहेत. शहरातील विविध भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तराखंड, राजस्थान, केरळ, गुजराथ आदी राज्यातील मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, मंत्री यांनी शहरात हजेरी लावली होती.
हेही वाचा >>>मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारासाठी रविवारी रविवारी केरळचे मंत्री सुरेश गोपी यांनी मिरा रोड येथे मतदारांच्या घरोघरी भेट देऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. याशिवाय उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी सप्तेश्वर मंदिराला भेट देऊन मतदारांना भावनिक हाक घातली. शनिवारी देखील राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची जाहीर सभा भाईंदर मघ्ये पार पडली. महाविकास आघाडीतर्फे देखील मारवाडी मतदारांना आकर्षित करण्यासाठी रविवारी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होेते. अपक्ष आमदार गीता जैन यांनी संध्याकाळी जननिर्धार सभा आयोजित केली होती.
या मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे नरेंद्र मेहता, महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसचे मुझफ्फर हुसेन तसेच आमदार गीता जैन अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.