भाईंदर : महापालिकेच्या सेल्फी पॉईंट मधील उघड्या विद्युत वहिनीच्या संपर्कात आल्याने गंभीररित्या भाजलेल्या ४ वर्षीय चिमुकलीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील ९ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. शहराचे सुशोभिकरण करण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने तीन वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून शहराच्या चौका-चौकात सेल्फी पॉईंट उभारले होते. ३० ऑक्टोबर रोजी मिरा रोडच्या गोल्डन नेस्ट येथील सेल्फीपॉईंटजवळ मेहशरजहाँ मुकेरी (४) ही चिमुकली वडिलांसोबत आली होती. मात्र सेल्फी पॉईंटच्या उघड्या विद्युत वहिनीच्या संपर्कात आल्याने तिला विजेचा धक्का बसला. यात ती गंभीर जखमी होती.

हेही वाचा : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू

तिच्यावर मागील दहा दिवसापासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान शुक्रवारी तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. मेंदू मधील रक्तप्रवाह थांबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नवघर पोलिसांनी यापूर्वीच सेल्फी पॉईंटच्या विद्युत संबंधित देखभाल- दुरुस्तीची कामे करणाऱ्या कंत्राट विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader