भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेत कार्यरत असलेल्या महिलांना आक्षेपार्ह मजकूर पाठवणे व लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिकेने स्थापन केलेल्या विशाखा समितीने हा निर्णय घेतला आहे. शासकीय, निमशासकीय, खासगी सेवेतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी सर्व कार्यालयांत आणि संस्थांमध्ये महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याचे शासनाचे आदेश आहे. या समित्यांना विशाखा समिती म्हणूनही संबोधले जाते.त्यानुसार मिरा भाईंदर महापालिकेत देखील महिला व बालकल्याण विभागामार्फत विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीत महिला सदस्यांसह आस्थापना विभागाचे प्रमुख सुनील यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.त्यावरून आलेल्या तक्रारीची दखल घेत ही समिती आपला अहवाल तयार करत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१ जानेवारी २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ दरम्यान या समितीमार्फत दोन प्रकरणे निकालात काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.यात महापालिकेच्या आवक-जावक आणि वैद्यकीय विभागात महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या दोन पुरुष कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.यातील एक कर्मचारी कायमस्वरूपी पदावर असल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. तर दुसरा कंत्राटी पद्धतीवर असल्याने त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.या दोन्ही प्रकरणात सखोल चौकशी केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याची माहिती विशाखा समितीच्या प्रमुख तथा उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी दिली आहे.

हेही वाचा : वसईत सिमेंट कारखाने व रेडिमिक्स वाहतुकीमुळे प्रदूषण वाढले

प्रकरण काय?

सदर प्रकरणे ही मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आवक- जावक आणि वैद्यकीय विभागातून समोर आली आहे. यात आवक-जावक विभागात कार्यरत असलेल्या एका पुरुष कर्मचाऱ्याने त्याच विभागात काम करणाऱ्या महिलेला स्वतःचीच अश्लील छायाचित्र पाठवली होती. त्यामुळे महिलेने याबाबतची तक्रार विशाखा समितीकडे केली होती.यात समितीने चौकशी केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने आपण चुकीच्या हेतूने हे कृत केल्याचे मान्य केले होते. त्यामुळे त्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन तपासण्यासाठी मनोरुग्णतज्ञ डॉक्टरांकडे शिफारस करण्यात आली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात वैद्यकीय विभागात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांला त्याच ठिकाणी काम करणाऱ्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याकडून लैगिक तसेच मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार आली होती. त्यावर देखील चौकशी करून सदर कर्मचाऱ्याला थेट कामावरून काढण्याचा व पिढीत महिलेची अन्य विभागात बदली करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विशाखा समितीच्या सदस्याकडून देण्यात आली आहे.