भाईंदर :-आगमी विधानसभा निवडणुकीसाठी मिरा भाईंदर १४५ विधानसभा क्षेत्रातून भाजप तर्फे उमेदवार म्हणून माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नावाची जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी जाहीर कार्यक्रमात घोषणा केली.यामुळे महायुती मधील अंतर्गत वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिरा भाईंदर १४५ विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व अपक्ष आमदार गीता जैन करतात.त्यामुळे जैन यांना हाताशी धरून महायुतीमधील जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेवर शिवसेनाचा आपला दावा आहे. तर मिरा भाईंदर हा परंपरागत भाजपचा बालेकिल्ला असून तो यंदा भाजपकडेच राहावा, म्हणून देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असल्याचे समजते.त्यामुळे ही जागा नेमकी कोणाकडे जाते याबाबतची चर्चा शहरात अग्र स्थानी आली आहे. भाजप मधून या जागेवर माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी दावा केला आहे. तसेच पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण ही निवडणुकी लढवू, असे म्हणत माजी जिल्हाध्यक्ष रवि व्यास यांनी देखील आपली तयारी पूर्ण केली आहे. तर महायुतीला समर्थन दिलेले असल्यामुळे ही जागा भाजपच्या किंवा शिवसेनेच्या गोट्यातून आपल्यालाच मिळावी म्हणून गीता जैन प्रयत्न करत आहे. त्यामुळे शहरात एकाच जागेवरून महायुतीच्या  उमेदवारांमधील अंतर्गत वाद हळूहळू शिघेला पोहचू लागला आहे.

Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
BJP Narendra Mehata in Mira Bhayander Assembly Constituency
Mira Bhayandar Vidhan Sabha Constituency : मीरा-भाईंदरची भाजपाची उमेदवारी अखेर नरेंद्र मेहतांनाच, मुख्यमंत्र्यांच्या सहयोगी आमदार गीता जैन एकाकी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Congress Candidates List Nana Patole
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

दरम्यान रविवारी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी  भाईंदरच्या लोटस मैदानात ‘संकल्प सभेचे’ आयोजन करून शक्ती प्रदर्शन केले. यावेळी मेहता यांना समर्थन देण्यासाठी तीसहुन अधिक माजी नगरसेवक आणि डजनभर पक्षातील प्रभावशाली नेते आणि हजारो कार्यकर्ते उपस्थितीत होते.यावेळी किशोर शर्मा यांनी नरेंद्र मेहता यांच्या मागे पक्ष उभा असून उमेदवार म्हणून मेहताच हवे असल्याची घोषणा केली. तसेच पक्षश्रेष्ठी आमच्या मागणीची दखल घेतील  असे ते जाहीर सभेत म्हणाले.तर आमदार गीता जैन यांच्यामुळे शहराचा विकास रखडला असून तो पूर्व पदावर आण्यासाठी आपण निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा नरेंद्र मेहता यांनी आपल्या भाषणात केली.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : हितेंद्र ठाकूर वसईतून लढणार; कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर केली घोषणा

निर्मला सावळे यांचा पक्ष प्रवेश

मिरा भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे यांनी रविवारी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत माजी आमदार नरेंद मेहता यांच्या नेतृत्वात भाजप पक्षात प्रवेश केला. सावळे यांनी  २००४ साली महापालिकेचा कारभार हाताळला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सक्रिय राजकारपासून अंतर ठेवले होते.

कार्यकर्त्यांना शपथ

भाजपच्या संकल्प सभा कार्यक्रम व्यासपीठावर माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या भाषणापूर्वी साधू संतांनी उपस्थिती दर्शवली.या वेळी भाजप कार्यकर्त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मेहतांनाच निवडून आणण्याची शपथ देण्यात आली. ‘ तोंडी’निवडणुक जाहीर नामा जाहीर आगमी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी नरेंद्र मेहता यांनी भाषणात आपला निवडणूक तोंडी जाहीरनामा जाहीर केला. यात महाविद्यालयाची उभारणी,पासपोर्ट ऑफिस, लिंक रोड उभारणी,भाईंदर-  नायगाव रस्त्याची उभारणी, गुजरातला जाणारी ट्रेन थांबवणे, नवीन महिला भवन उभारणी , फेरीवाला क्षेत्र उभारणी, रिक्षा स्टॅन्ड उभारणी, क्रिकेट स्टेडियम उभारणी, एसआरए योजना शहरासाठी लागु करणे, परिवहन सेवा बळकट करणे, ३० फूट उंच गौतम बुद्धांचा  पुतळा उभारणे,गौशाळेची उभारणी करणे,सोसायटीचे डीम कन्व्हेन्स करण्यासाठी कार्यालय उभारणी,शिलोत्र्यांच्या मिठागराच्या जागा, २४ तास पाण्याची सोय, मजबूत रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांची उभारणी करणार असल्याची घोषणा करण्यात आली.