वसई : मिरा रोड च्या नया नगर येथील धार्मिक मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने गुरुवार २५ जानेवारी रोजी पुकारलेला मीरा रोड, भाईंदर बंद मागे घेतला आहे.शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर बंदची घोषणा केली होती.

शहरातील तणाव निवळत असून मराठा आरक्षणाचा मोर्च्यासाठी मिरा भाईंदरमधून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मुंबईत दिला जाणार आहे, त्यामुळे पोलिसांनी बंद मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील चर्चा करून कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे बंद मागे घेत असल्याची बुधवारी प्रताप सराईनक यांनी जाहीर केले. मात्र कुणी डिवचण्याच्या प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नालासोपार्‍यात भर रस्त्यात तरूणीवर चाकू हल्ला; प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाचे कृत्य

शांती संदेश आणि  शाती तिरंगा यात्रेचे आयोजन

नया नगर मध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. कॉंग्रेस नेते मु्ज्जफर हुसेन हे घरोघरी भेटी देऊन शांततेचे आवाहन करत आहेत. तर शुक्रवारी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी ‘श्रीराम शांती तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा भाईंदर ते मिरा रोड शहरात फिरून नागरिकांना शांततेचे आवहन करणार आहे.  या यात्रेत विविध धर्माचे नागरिक सहभाग घेणार असून सर्वाना शांततेचा संदेश देणार आहेत.

Story img Loader