कल्पेश भोईर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वसई: मुंबईपाठोपाठ आता वसई-विरार शहरातही मियावाकी वने उभारली जाणार आहेत. शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वसई विरार शहरात महापालिकेकडून  मियावाकी वने विकसित करण्यात येणार आहेत. ५ ठिकाणी ही वने उभारली जाणार असून यासाठीच्या वृक्षलागवड, संगोपनाकरिता महापालिकेकडून निविदा काढण्यात आल्या आहेत.

मागील काही वर्षांत वसई विरार शहर हे प्रदूषणाच्या विळख्यात सापडू लागले आहे. तर काही ठिकाणच्या भागात असलेला हरितपट्टा ही अतिक्रमण यामुळे नष्ट होऊ लागला आहे. याच अनुषंगाने आता पालिकेने जपानी पद्धतीच्या ‘मियावाकी’ तंत्रज्ञान वापरून वसईतही वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या मियावाकी पद्धतीमध्ये अगदी कमी जागेत अधिक झाडांची लागवड केली जाते.

ही वृक्ष लागवड करण्यासाठी पालिकेला शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ  हवा कार्यक्रमांतर्गत  (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम) १ कोटी ७० लाख रुपये इतका निधीही उपलब्ध झाला आहे. शहरातील ५ ठिकाणी अशी वने तयार करण्यात येणार आहेत. यात प्रत्येकी पाचशे चौरस मीटर असे पाच प्लॉट तयार करण्यात येणार असून त्यासाठी जागेचा शोध ही सुरू असल्याचे पालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

विशेषत: शहरी व औद्योगिक भागात अशी वने उभारली  जाणार आहेत. या वनामुळे शहरातील विविध ठिकाणच्या भागात घनदाट जंगल तयार होऊन शहरातील प्रदूषण कमी होण्यास व नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे.

काय आहे मियावाकी पद्धत

अतिशय कमी जागेचा वापर करून जास्तीत जास्त झाडं लावण्याची पद्धत म्हणजे ‘मियावाकी’ यात जमिनीची गुणवत्ता लक्षात घेऊन खते, अन्नद्रव्यं वापरल्याने या पद्धतीनं येणारी झाडं पारंपरिक पद्धतीपेक्षा तीस पट वेगाने वाढून घनदाट जंगल तयार होते. जपानमधील वनस्पतीशास्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी हे तंत्र विकसित केलं असल्यानं या पद्धतीला ‘मियावाकी’ असे संबोधले जाते. या पद्धतीत ५०० चौरस मीटर क्षेत्रात जास्तीत जास्त झाडांची लागवड होऊ शकते. तसेच ही झाडे लागवड करताना तीन फूट खोल खड्डा खणतात. त्यातील सगळी माती काढून शेणखत, गहू-भाताचा कोंडा, विविध खतं टाकलेली नवी माती भरून झाडांची लागवड केली जाते.

वसई विरार शहरात मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड केली जाणार आहे. पाच ठिकाणी अशी लागवड होणार आहे. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

– चारुशीला पंडित,

उपायुक्त (वृक्ष प्राधिकरण) वसई विरार महापालिका