वसई : विरार रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल चोरी करणाऱ्या चोरटय़ास रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याला प्रत्यक्ष चोरी करतानाच पकडून त्याच्याकडून हजारोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोकलमधील गर्दीचा फायदा घेत रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या खिशातून मोबाइल चोरी करण्याच्या घटना नवीन नाहीत. विरार स्थानकात अशाच प्रकारे चोरी करून एक चोरटा पळ काढण्याच्या तयारीत होता. याच दरम्यान रेल्वे स्थानकामध्ये त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक अनिल सोळंकी आणि शिंदे यांनी आरोपीला पकडले. सैफ रियाज खान असे या आरोपीचे नाव असून त्यांच्या विरोधात रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची अधिक चौकशी केली असता याआधी घडलेले मोबाइल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचबरोबर त्याच्याकडून विविध कंपन्यांचे मोबाइल आणि इतर मुद्देमालही हस्तगत केला असल्याची माहिती, रेल्वे पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली आहे.
रेल्वे स्थानकात मोबाइल चोरी करणाऱ्यास अटक
विरार रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल चोरी करणाऱ्या चोरटय़ास रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 30-04-2022 at 01:45 IST
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile phone thief arrested railway station locals virar crime police amy