वसई : विरार रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल चोरी करणाऱ्या चोरटय़ास रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याला प्रत्यक्ष चोरी करतानाच पकडून त्याच्याकडून हजारोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोकलमधील गर्दीचा फायदा घेत रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या खिशातून मोबाइल चोरी करण्याच्या घटना नवीन नाहीत. विरार स्थानकात अशाच प्रकारे चोरी करून एक चोरटा पळ काढण्याच्या तयारीत होता. याच दरम्यान रेल्वे स्थानकामध्ये त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक अनिल सोळंकी आणि शिंदे यांनी आरोपीला पकडले. सैफ रियाज खान असे या आरोपीचे नाव असून त्यांच्या विरोधात रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची अधिक चौकशी केली असता याआधी घडलेले मोबाइल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचबरोबर त्याच्याकडून विविध कंपन्यांचे मोबाइल आणि इतर मुद्देमालही हस्तगत केला असल्याची माहिती, रेल्वे पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा