वसई : खासगी गाडीतील वाहनचालक आणि प्रवाशांनी विनयभंगाचा प्रयत्न केल्यामुळे एका वीस वर्षीय महिलेने आपल्या चिमुकल्या मुलीसह धावत्या गाडीतून उडी मारली. या घटनेत दहा महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला तर ही महिला जखमी झाली. या प्रकरणी विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यात वाहनचालक आणि इतर  तीन अनोळखी प्रवाशाविरोधात विनयभंग आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाडा येथे राहणारी २० वर्षांची महिला दहा महिन्यांच्या मुलीसह नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार गावातील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. शनिवारी सकाळी ती वाडा येथे परत जाण्यासाठी निघाली होती. खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या इको वाहनात ती मुलीसह बसली या वेळी वाहनांमध्ये अन्य तीन प्रवासी होते. ते मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हारजवळील नोवेल्टी हॉटेलच्या समोरून जात असताना या महिलेने मुलीसह गाडीतून उडी मारली. या घटनेमध्ये मुलीचा मृत्यू झाला तर महिला जखमी झाली. वाहनचालक तसेच इतर प्रवाशांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी मुलीसह उडी मारल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

Domino Effect Crash Sudden Scooty Brake Causes Multi-Vehicle Pileup Internet Reacts WATCH
“वो स्त्री है कुछ भी कर सकती है…” भररस्त्यात दुचाकीस्वार काकूंनी अचानक मारला ब्रेक, एकमेकांना धडकल्या मागून येणाऱ्या गाड्या, विचित्र अपघाताचा Video Viral
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Rickshaw driver arrested , molesting woman ,
पुणे : प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत
Bihar Class 10 Girl Accident
घराच्या छतावर अभ्यास करणाऱ्या मुलीला माकडाने दिला धक्का, खाली पडून १० वीतल्या मुलीचा मृत्यू
pimpri female patient dies due to guillain barre syndrome
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू
private school bus in Umarkhed accident near Palshi Fata on Saturday killing ninth grade student
भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, चार जखमी; वाई बसस्थानकासमोर अपघात
old woman died , teen Hat Naka area, Thane,
दूध आणण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, ठाण्याच्या तीन हात नाका भागातील घटना
Youth dies in BEST bus bike accident in Mumbai print news
मुंबईः पुढे जाण्याच्या प्रयत्नात बेस्ट बसची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू, बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यामध्ये वाहनचालक तसेच इतर प्रवाशांविरोधात विनयभंगाचा तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले असून इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे. ही महिला सुरुवातीला आपला जबाब बदलत होती. मात्र उशिरा आम्ही तिच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली. अन्य प्रवाशांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader