भाईंदर :  भाईंदर पश्चिम येथील राई-मुर्धे गावात ‘मेट्रो  ९’  चे कारशेड  प्रकल्पाबाबत  पर्ययी जागेचा विचार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी येथील एका कार्यक्रमात सांगितल्यामुळे कारशेडबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारशेड उभारण्याचे जवळजवळ नक्की झाले असून नागरिकांचा विरोधही तीव्र होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमातील वक्तव्याने  मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. 

मीरा-भाईंदर मेट्रो मार्गिका ९  चे काम गेल्या अडीच वर्षांपासून प्रगतिपथावर सुरू आहे. या मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या कारशेडची जागा भाईंदर पश्चिम येथील राई-मुर्धे गावालगत ८७ एकरांत एमएमआरडीएने निश्चित केली आहे.  शेतजमिनींच्या जागेवर कारशेड केल्यामुळे स्थानिक शेतकरी उदध्वस्त होणार आहे. तसेच मेट्रो मार्गामुळे शेकडो वर्षे जुनी घरे तुटणार आहेत, त्यामुळे त्यास विरोध करत येथील ग्रामस्थांनी मेट्रो व कारशेडविरोधात आंदोलन सुरू केले आहे.  १७ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती. यावेळी कारशेड हे राई-मुर्धे गावात न उभारता तेथून जवळ असलेल्या खोपरा गावाजवळ उभारावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीदेखील खोपरा येथील जागेचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले होते. त्यानुसार अहवाल नुकताच मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. यात खोपरा येथे मेट्रो कारशेड उभारल्यास शासनाला मूळ कारशेडच्या दुप्पट खर्च उचलवा लागणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे अधिकचा खर्च उचलावा लागु नये म्हणून मेट्रो कारशेड त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

अशा परिस्थिती सोमवारी कला महोत्सवाच्या कार्यक्रमात आमदार प्रताप सरनाईक यांनी भाषणात मेट्रोचा मुद्दा नागरिकांच्या दृष्टीने मार्गी लावावा, अशी मागणी केली. यावर ग्रामस्थांच्या मागणीला गांभीर्याने घेत मेट्रो कारशेड प्रकल्प पुढे स्थलांतरित करण्यासाठी योग्य निर्णय घेऊ, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली होती. यामुळे कारशेडसंदर्भात शासनाची नेमकी भूमिका काय? असा संभ्रम स्थानिक ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.

Story img Loader