भाईंदर : मिरा भाईंदर मधील कुस्ती प्रेमींसाठी महापालिकेमार्फत कुस्ती आखाड्याची बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जागा निश्चित करण्यात आली असून वर्ष अखेरीचे हे काम पूर्ण होणार आहे.मिरा भाईंदर शहरात कुस्ती खेळात रुची असलेला एक मोठा वर्ग आहे. सध्या भाईंदर पश्चिम येथे असलेल्या श्री गणेश आखाड्यात अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून देशभर नावलौकिक करत आहेत.त्यामुळे शहरातील कुस्ती प्रेमी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी भाईंदरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर भागात असलेल्या पालिकेच्या समाज मंदिर जागेत नव्याने कुस्ती आखाडा इमारत उभारण्याचा निर्णय आयुक्त संजय काटकर यांनी घेतला आहे.

यात नाममात्र दरात कुस्ती प्रेमींना प्रशिक्षण आणि खुराक उपलब्ध करून देण्याची सोय केली जाणार आहे.ही इमारत उभारण्यासाठी महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.वर्ष अखेरीस हे काम पूर्ण देखील होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.तर राज्यभरात कुस्ती आखाद्यासाठी स्वतंत्र इमारत उभारून देणारी ही पहिलीच महानगरपालिका असल्याचा दावा करण्यात येत आहे.

सदर इमारत ही तळ अधिक चार मजल्याची असणार आहे. यात तळ मजल्यावर वाहन तळाची सोय करण्यात आली आहे.पहिल्या मजल्यावर कुस्ती आखाडा आणि व्यायाम शाळा उभारण्यात येणार आहे.दुसरा मजला हा प्रेक्षक गॅलरी साठी उपलब्ध असणार आहे. तर ही जागा समाज मंदिरासाठी आरक्षित असल्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर सभागृह उभारले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Story img Loader