वसई: वीज गळती यामुळे होणारे  नुकसान टाळण्यासाठी वीज गळती कमी करण्याच्या महावितरणनाच्या प्रयत्नंना यश आले आहे. मागील काही महिन्यात १९.२० टक्कय़ांवर असलेली वीज गळतीचे प्रमाण १८ टक्कय़ांवर आणले आहे. त्यामुळे सुमारे एक टक्कय़ांने वीज गळती कमी झाली आहे.

वसई, विरार शहरासह वाडा परिसरात महावितरणकडून ९ लाख ३८ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो यात घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी असा वीज ग्राहकांचा समावेश आहे. मात्र वीज वितरण करताना व विविध प्रकारच्या निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे वीज गळती होत असते. तर दुसरीकडे वीजचोरीचे प्रकार यामुळे महावितरणला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. होणारी वीज गळती कमी करण्यासाठी महावितरणने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. यात फिडरची क्षमता वाढविणे, रोहित्रांची संख्या वाढविणे, रबर कोटिंग बंच कंडक्टर लावणे अशा कामांची सुरुवात केली आहे. तसेच वीजचोरीचे प्रकार घडत होते त्यावर चेक मशीन, झेरा मशीन यंत्राचा वापर करून मीटर तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे छुप्या मार्गाने  वीजचोरी करणारे सापडू लागले आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी वीज गळतीचे प्रमाण हे १९.२० टक्के इतके होते. आता हे प्रमाण १८ टक्के इतके झाले असल्याचे  अधीक्षक अभियंता राजेश चव्हाण यांनी सांगितले आहे.  एक टक्क्याने वीज गळतीचे प्रमाण कमी झाले असून १८ हजार लाख रुपयांनी  महसुलात वाढ झाली आहे.

Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
Congress led UDF accuses Kerala government of increasing electricity bills for Adani  benefit
अदानींच्या फायद्यासाठी वीजबिलात वाढ; काँग्रेसप्रणीत ‘यूडीएफ’चा केरळ सरकारवर आरोप
nitin Gadkari marathi news
इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चार कोटी रोजगार… गडकरींनी थेट रोडमॅपच मांडला…
incident of Lonavala Municipal Council discharging sewage directly into rivers Pune news
लोणावळा नगर परिषदेकडून जलप्रदूषण! सांडपाणी थेट नद्यांत सोडल्याचा धक्कादायक प्रकार

अधिक वीज उपलब्ध होण्यास मदत 

राज्यासह वसई विरारच्या भागात वीजगळती व वीजचोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. वितरण यंत्रणेत वीजचोरी अनेक पद्धतीने होते. आकडे टाकून, मीटरचे रीडिंग बदलून, अनधिकृत वीज जोड घेऊन वीज चोरी केली जाते. विजेच्या क्षेत्रात होणारे नुकसान हे प्रामुख्याने वीजचोरीमुळेच अधिक होते. जर हे प्रमाण कमी झाल्यास वीजनिर्मितीत भर पडून अधिक वीज ग्राहकांना उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे. प्रत्येक एक टक्का चोरी व गळती थांबवल्याने वीज निर्मितीत ८०० मेगावॅटची भर पडत असते.

वीज गळतीमुळे होणारा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. टप्प्याटप्प्याने उपाययोजना राबवून वीज गळती कमी केली जाणार आहे. 

— राजेश चव्हाण, अधीक्षक अभियंता, महावितरण, वसई

Story img Loader