वसई : वसई पश्चिमेच्या सनसिटी येथील मिठागरच्या पंधराशे एकर जागेवर धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. यासाठी मिठागराच्या जागा ताब्यात घेण्यासाठी केद्रीय पातळीवरून हालचाली सुरू असल्याचे ते म्हणाले. वसईचे धारावी होऊ देणार नाही आणि हा प्रस्तावित पुर्नवसन प्रकल्प आम्ही हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वसई शहराच्या पश्चिमेस रेल्वे स्थानकालगत असलेली सोपारा, आचोळे, नवघर-माणिकपूर, दिवाणमान अशी जवळपास पंधराशे एकर जागा महाराष्ट्र शासनाने गोगटे सॉल्ट या कंपनीस मिठागरासाठी व केमिकल प्रकल्पासाठी भाडेतत्वावर दिली गेली होती. परंतु पहिल्या कराराप्रमाणे रासायनिक प्रकल्प (केमिकल प्लान्ट) झाला नाही व स्थानिकांना नोकऱ्याही मिळाल्या नाहीत. त्यानंतर या कंपनीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत २०१४ साली संपुष्टात आली. मात्र केंद्र सरकारने आता ही जागा धारावी पुनर्विकास योजनेदरम्यान स्थंलातरित होणाऱ्या अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी वापरण्याचे ठरवले आहे. यासाठी राज्यातील मिठागरांच्या जागा ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय पातळीवर योजना आखल्या जात असल्याचा आरोप आमदार क्षितीज ठाकूर यांनी केले आहे. मुंबईतील धारावी ही आशियातील दुसऱ्या क्रमांकाची झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. अदानी समूहातर्फे धारावीमधील झोपडपट्ट्यांचे पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प सात वर्षांत उभारण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पादरम्यान स्थलांतरित होणाऱ्या हजारो अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन वसई पश्चिम येथील मीठागरांच्या जागेत करून हा प्रचंड मोठा भूखंड अदाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे असा आरोप आमदार क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. ही जागा ताब्यात आल्यास या पंधराशे एकर जागेवर अदाणींच्या माध्यमातून धारावीतील रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल आणि वसईच्या नियोजनाचा बोजवारा उडेल अशी भीती ठाकूर यांनी व्यक्त केली.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
bjp leader ashish shelar article allegations on shiv sena ubt for plot grab in dharavi
पहिली बाजू : भूखंड खादाडांचा डाव उद्ध्वस्त
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार

हेही वाचा : लांब पल्ल्याच्या गाड्यांना भाईंदरमध्ये थांबा मिळणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन

मिठागराच्या जागेवर रुग्णालय, आयटी पार्क उभारा

ही मिठागराची जागा वसई-विरार महापालिकेला हस्तांतरित करण्यात यावी आणि तेथे वांद्रे-कुर्ला व्यावसायिक संकुलाच्या धर्तीवर या जागेचा विकास करता येऊ शकेल, अशी संकल्पना क्षितीज ठाकूर यांनी यापूर्वीच मांडली होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी सरकार दरबारी पाठपुरावाही केलेला होता. ही जागा पुनर्वसन प्रकल्पाला देण्याऐवजी या जागेचा सुनियोजित विकास व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, स्टेडीयम आयटी पार्क या जागेवर उभारावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा : भाईंदर : नरेंद्र मेहता यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर, कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्याने जैन यांचे ठिय्या आंदोलन

धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन भांडुप, मुलुंड, मालवणी आदी ठिकाणी करण्यात येणार आहे. सध्या वसईतील मिठागराच्या जागेवर धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.