वसई: नालासोपारा येथील अवधेश विकास यादव शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकऱणाातील आरोपींवर अखेर कलमे वाढविण्यात आली आहे. याप्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकाविरोधात कलम वाढविण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन येथे यादवेश विकास इंग्रजी शाळा आहे. या शाळेत ९ वीत शिकणार्‍या १४ वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतील शिक्षक अमित दुबे हा मागील ५ महिन्यांपासून धमकावून बलात्कार करत होता. पोलिसांनी त्याच्यावर बलात्कारा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली होती. परंतु शाळेचा मुख्याध्यापक विकास यादव आणि पर्यवेक्षख संतालाल यादाव यांनी हा प्रकार दडवला होता. २०२२ मध्ये दुबे पीडित मुलीचा लैंगिक छळ करत होता. हा प्रकार पीडित मुलीने पर्यवेक्षक संतलाल यादव आणि मुख्याध्यापक विकास यादव यांना सांगितला होता. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याबाबत पीडित मुलीचा भाऊ विचारणा करण्यासाठी गेला असताना त्याला मुख्याध्यापक विकास यादव याने मारहाण केली होती. आता देखील बलात्काराची घटना घडल्यानंतर या दोघांनी प्रकरण मिटविण्यास सांगितले होते. जनक्षोभानंतर पेल्हार पोलिसांनी फिर्यादी मुलीचा नव्याने पुरवणी जबाब नोंदवून मुख्याध्यापक विकास यादव आणि पर्यवेक्षक संतलाल यादव याच्याविरोधात पोक्सोच्या कलम २१ (२), आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२) ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

Mumbai rape case
मुंबई: दहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
A case has been filed against two people including the former working president of pune vidyarthi gruha Pune news
पुणे विद्यार्थी गृहाच्या माजी कार्याध्यक्षांसह दोघांविरुद्ध गुन्हा
Gang rape of a minor girl vasai crime news
वसई: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
40 students beaten up in municipal school in Sangli news
सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित
kalyan de addiction centre staffers arrested for assaulting patients
दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार
Complaint of molestation of a minor child in a juvenile detention center Mumbai
बाल निरीक्षणगृहात अल्पवयीन मुलावर अत्याचाराची तक्रार ; अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा
sexual harassment
पुणे: शाळकरी मुलाशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा

हेही वाचा : वसईत गणेशोत्सव की फलकोत्सव? फलकांमुळे शहर विद्रूप, रस्ता अडवून मंडप उभारणी

मात्र ही कलमे किरकोळ असून या मध्ये केवळ २ वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याने त्यांना अटक करता येत नव्हती. यामुळे शिवसेना ठाकरे गटाने कलम वाढविण्यात यावीत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. शिवसेनेच्या या मागणीला यश आले आणि पोलिासंनी कलमांत वाढ केली. मुख्याध्यापक आणि पर्यवक्षेकाविरोधात आता कलम १७ आणि १९ ची वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा : मिरा रोड येथे सर्वधर्मीय दफनभूमीचा निर्णय मागे

पोलिसांनी कलमे वाढवली ही समाधानाची बाब आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची आमची मागणी कायम आहे. शाळा अनधिकृत असून त्यावर कारवाईसाठी आमचा लढा चालूच राहणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सरचिटणीस ॲड अनिल चव्हाण यांनी सांगितले. आरोपी अमित दुबे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा आम्ही सखोल तपसा करत आहोत अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक जावेद मुल्ला यांनी दिली.