वसई- नालासोपार्‍याती ४१ इमारतींवरील कारवाई दुसर्‍या दिवशी थंडावली आहे. गुरुवारी ७ इमारती पाडल्यानंतर मोठ्या प्रमाणात राडारोडा जमा झाल्याने कारवाईत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसभर हा राडारोडा हटविण्याचे काम सुरू होते.

नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथे क्षेपणभूमी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी ४१ अनधिकृत इमारती बांधल्या आहेत. या इमारतीत २ हजारांहून अधिक कुटुंबे राहत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या इमारती बेकायदेशीर असल्याचे ठरवून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश वसई विरार महपालिकेला दिले होते. त्यानुसार गुरुवारपासून पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.

Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा
46 unauthorized water connections disconnected in Ulhasnagar news
उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या; पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही

हेही वाचा – मध्य रेल्वेच्या वसई दिवा रेल्वे मार्गावरील वाहतूक जवळपास तीन तासांनी सुरळीत

पहिल्या दिवशी एकूण ७ इमारती पाडण्यात आल्या. या इमारती अतिधोकादायक (सी १) वर्गातील होत्या. त्यामुळे तेथील रहिवशांना बाहेर काढून कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी पुढील इमारतींवर कारवाई करण्यात येणार होती. मात्र शुक्रवारी कारवाई झाली नाही. पहिल्या दिवशी ७ इमारती पाडण्यात आल्या होत्या. त्याचा राडारोडा मोठ्या प्रमाणावर जमा झाला आहे. त्यामुळे कारवाईसाठी अडथळा निर्माण झाल्याने शुक्रवारची कारवाई स्थगित करण्यात आली आहे. राडारोडा उचलण्याचे काम सध्या सुरू आहे. तो उचलून परिसर मोकळा झाल्यानंतर पुढील इमारतींवर कारवाई केली जाईल, असे पालिकेचे उपायुक्त (अतिक्रमण) दिपक सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा – वसई: नायगावमध्ये कार-ऑटोरिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालक जागीच ठार, तर दोन प्रवासी व कारचालक जखमी

कारवाई झाली नसली तरी शुक्रवारी या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. सर्वत्र माती, विटांचा ढिगारा, राडारोडा होता. आपल्या घरांची मातीमोल झालेली अवस्था पाहून रहिवाशी हळहळ व्यक्त करत होते. कारवाई सुरू झाल्याने रहिवाशांनी अन्यत्र आपले बस्तान हलविण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

Story img Loader