लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : नालासोपारा मधील २०१८ साली झालेल्या जोगिंदर राणा याच्या चकमक प्रकरणात ठाण्याच्या विशेष तपास पथकाने नालासोपारा मधील दोन पोलिसांना शनिवारी अटक केली. मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ अशी या पोलिसांची नावे आहेत. त्यांना ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक
An attempt by the accused in the Bopdev Ghat case to mislead the police Pune news
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
Mumbai assassination plan during election was failed by police
निवडणुक काळात मुंबईत घातपाताचा कट उधळला, गुन्हे शाखेकडून ९ पिस्तुलांसह शस्त्रसाठा जप्त

२०१८ मध्ये नालासोपारा येथे सराईत गुंड जोगिंदर राणा याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. मात्र ही चकमक बनावट असून माझ्या भावाची हत्या केल्याचा आरोप मयत जोगिंदर राणा याचा भाऊ सुरेंद्र राणा याने केला होता. स्थानिक पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या प्रकरणात सुरेंद्र राणा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठाणे पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची ( एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. २०२३ मध्ये या प्रकरणात मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ या दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्या दोघांना अटक करण्यात आली नव्हती.

आणखी वाचा-पालिका अभियंत्यांचा पबमधील नृत्याचा व्हिडियो वायरल, भूमाफियांनी पार्टी आयोजित केल्याचा आरोप

दरम्यान, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांवर जोरदार ताशेरे ओढले आणि या प्रकरणाचा तपास समाधानकारक होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शनिवारी तातडीने कारवाई करत चव्हाण आणि सकपाळ या दोघांना अटक केली. त्या दोघांना वसई न्यायालयात हजर केले असता दोघांना ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती विशेष तपास पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी दिली. सध्या मंगेश चव्हाण सध्या नालासोपारा पोलीस ठाण्यात तर मनोज सकपाळ गुन्हे शाखा ३ च्या पथकात कार्यरत होते.

कोण होता जोगिंदर राणा?

नालासोपारा येथे राहणारा जोंगिदर राणा हा सराईत गुंड होता. त्याच्यावर वांद्रे, खार, सांताक्रूझ, जुहू, कांदिवली आणि अर्नाळा पोलीस ठाण्यात ३७ गुन्हे दाखल होते. त्यात चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांचा समावेश होता. त्यातील बहुतांस गुन्ह्यात तो शिक्षा भोगून आला होता. विरार मधील अर्नाळा पोलीस ठाण्यात त्याच्यावर एक गुन्हा दाखल होता. माझ्या भावाने गुन्हेगारी विश्व सोडले होते आणि तो चालक म्हणून काम करत होता असे ते म्हणाले असे सुरेंद्र राणा यांनी सांगितले.