लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मिरा भाईंदर शहरात भटक्या श्वानासोबतच मांजरांचे निर्बिजीकरण प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. मागील तीन महिन्यात ७८ मांजरावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर मांजराचे निर्बिजीकरण करणारी राज्यातील पहिली महापालिका असल्याचा दावा प्रशासनाचा दावा आहे.

Relief for police transferred to Mumbai 7 police officers back in Vasai and Bhayander
मुंबईत बदल्या झालेल्या पोलिसांना दिलासा; ७ पोलीस अधिकारी पुन्हा वसई, भाईंदरमध्ये
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
bhayandar crime news
मिरा रोड मध्ये गोळीबारात दुकानदाराचा मृत्यू
mobile toilets burnt loksatta news
मुंबई : ॲण्टॉप हिल येथे दहा शौचालये जाळली, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
mumbai Experts suspect drugs used on Mandul snake seized from Cuffe Parade gang
मांडूळ सापावर औषधांचा प्रयोग, दुतोंड्या हा गैरसमज
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती
AMU minority status upheld 1967 decision quashed by Supreme Court
‘एएमयू’चा अल्पसंख्याक दर्जा कायम, १९६७ चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; नियमित खंडपीठात सुनावणी

मिरा भाईंदर शहरात जवळपास दहा हजाराहून अधिक मोकाट फिरणारी मांजरे आहेत. प्रामुख्याने ही मांजरे मासळी बाजार, चिकन शॉप, उद्यान, मैदान आणि गृह संकुल परिसर आवारात अधिक प्रमाणात दिसून येतात. वाढत्या मांजराच्या संख्येमुळे नागरिकांना विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यात मांजरांमुळे पसरणारी दुर्गंधी आणि धावत्या वाहनाखाली पिल्याच्या येण्याचा त्रास सर्वाधिक आहे.

आणखी वाचा-नववर्षाच्या पार्टीत आवाजावरून मारहाण, जखमी तरुणाचा मृत्यू

त्यामुळे शहरातील भटक्या श्वानाची संख्या आटोक्यात आण्यासाठी त्यांचे निर्बिजीकरण करण्यात येत असताना त्यात मांजराचाही समावेश करण्याचा निर्णय प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी घेतला होता.मात्र यंत्रणाचा अभाव असल्यामुळे प्रत्यक्ष या नियमांची अंमलबजावणी होत नव्हती.

दरम्यान काही महिन्यापूर्वीच मिरा रोडच्या पूनम सागर परिसरात महापालिकेने पशु वैद्यकीय दवाखाना सुरु केला आहे.यात मांजराचे निर्बिजीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे बसवण्यात आली आहेत.त्यानुसार सप्टेंबर ते डिसेंबर अशा तीन महिन्यात प्रशासनाने एकूण ७८ मांजराचे निर्बिजीकरण केले आहे.तर येत्या दिवसात उत्तन येथे मांजरासाठी नवे निर्बिजीकरण केंद्र उभारून कामास गती देणार असल्याची माहिती पालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी विक्रम निराटले यांनी दिली आहे.

आणखी वाचा-अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार, कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल

पशुप्रेमींचा सकारात्मक प्रतिसाद

मिरा भाईंदर शहरात मांजराचे निर्बिजीकरण करण्यासाठी पशु प्रेमी स्वतः मोकाट मांजराना दवाखान्यात घेऊन येत आहेत.यामुळे आता पर्यंत दवाखान्यात आलेल्या ७८ पैकी ७८ अशा शंभर टक्के मांजरावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली आहे.एका मांजरावर शस्त्र क्रिया केल्यानंतर उपचारासाठी पाच दिवसाचा कालावधी लागत असल्याची माहिती पशु संवर्धन अधिकारी विक्रम निराटले यांनी दिली आहे.

८ हजार ९९३ श्वानाचे निर्बिजीकरण

मिरा-भाईंदर महापालिकेकडून उत्तन परिसरात श्वान निर्बिजीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.या केंद्रात जवळपास १०० श्वानांवर एकाच वेळी उपचार करण्याची क्षमता आहे. त्यानुसार मागील दोन वर्षात याठिकाणी ८ हजार ९९३ भटक्या श्वानाचे निर्बिजीकरण करण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.एका श्वानाचे निर्बिजीकरण करण्यासाठी पाच ते सात दिवसाचा कालावधी लागतो.

Story img Loader