वसई: साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. यावर्षी पालघर जिल्ह्यात दसऱ्याच्या निमित्ताने परिवहन विभागात ३ हजार ६८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यातून ११ कोटी ९४ लाखाचा महसूल परिवहन विभागाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत दीड हजारांनी वाहनांची नोंदणी वाढली आहे.सणासुदीच्या काळात नवीन वस्तू व वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा विशेष कल असतो.साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा हा त्यातील एक महत्वाचा मुहूर्त. या निमित्ताने विविध नवीन वस्तू व वाहने खरेदी करण्यावर नागरिकांचा भर असतो.

ST buses Amravati scrap , passengers Amravati ST bus,
अमरावतीत १४९ एसटी बसेस भंगारात; कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण

हेही वाचा >>>वसई: महामार्गावरील सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे सदोष काम, तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू

प्रवासाच्या दृष्टीने सध्या वाहन ही माणसाची गरज बनू लागली आहे.  त्यामुळे वाहने खरेदी करण्यासाठी नागरिकांचा उत्साह पहायला मिळत आहे. वाहन खरेदी करण्यासाठी  ग्राहकांनी काही दिवस आधी पासून वाहने विक्रीच्या दुकानात वाहनाबाबत चौकशी, आवडीचा रंग , त्यांच्या किंमती, कर्ज प्रक्रिया करण्यास सुरवात केली होती. तर काही ग्राहकांनी आधिच आगाऊ रक्कम देऊन वाहने नोंद करून ठेवली होती. 

यावर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने मागील दहा दिवसांत वसईच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३ हजार ६८१ इतक्या नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.मागील वर्षी २ हजार १६६ वाहनांची नोंद झाली होती. त्यामुळे यावर्षी वाहन नोंदणीच्या संख्येत १ हजार ५१५ ने वाढ झाली आहे. नोंदणी केलेल्या वाहनात दुचाकी २ हजार ४७०, चार चाकी (कार) ५४५, ऑटोरिक्षा १९८, ट्रक २७४ व इतर  १९४व इतर या वाहनांचा समावेश आहे.

हेही वाचा >>>आयुक्तालयातील १९ व्या पोलीस ठाण्याची निर्मिती; बोळींज पोलीस ठाण्याचे गृहमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

या वाहनांची नोंदणी करताना शुल्क आकारले जाते या नोंदणी शुल्कातून ११ कोटी ९४ लाख रुपये इतका महसुल मिळाला असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे यांनी  सांगितले आहे.सद्यस्थितीत वाढत्या महागाईमुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढत आहेत. वाहनांच्या किंमतीत ही वाढ होत आहे. यावर्षी वाहनांच्या किंमती साधारणपणे १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

दसऱ्यानिमित्ताने नोंद झालेल्या वाहनांची आकडेवारी

२०२२- १ हजार ८९५ 

२०२३- २ हजार १६६

२०२४- ३ हजार ६८१

Story img Loader