वसई: विरार पोलिसांच्या ताब्यातून एक आरोपी फरार झाल्याची घटना घडली आहे. मनोहर पार्टे (४८) असे या आरोपीचे नाव आहे. सोमवारी रात्री वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले असताना तो एका पोलिसाला धक्का मारून पळून गेला.

विरार पोलिसांनी मनोहर पार्टे(४८) या आरोपीला चोरीच्या गुणांमध्ये अटक केली होती. सोमवारी रात्री त्याला विरार पूर्वेच्या जीवदानी रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. यावेळी एक पोलीस कर्मचारी सोबत होता. मात्र रात्री दहाच्या सुमारास बंदोबस्ताला असलेला पोलीस कर्मचारी चंदनशिवे याच्या हाताला झटका देऊन पार्टे पसार झाला. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader