वसई : विरारजवळील नारंगी, चिखल डोंगरी, मारंबलपाडा, बोिळज येथील भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या उघाडय़ा या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतातही भरतीचे खारे पाणी घुसून नुकसान होऊ लागले आहे. यासाठी या भागात उघाडय़ा कार्यान्वित करण्यात याव्या, अशी मागणी येथील शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.
पावसाचे पाणी व भरतीचे पाणी याचा योग्य तो निचरा व्हावा यासाठी या भागात खारभूमी विभागाने बांध व उघाडय़ा तयार केल्या होत्या. परंतु त्यानंतर त्यांच्या देखभाल दुरुस्ती करण्याकडे खारभूमी विभागाने पाठ फिरविली असल्याने याचा मोठा फटका हा या भागातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे.
या भागात खारभूमी विकास खात्यातर्फे १९६७ मध्ये नारंगी चिखलडोंगरे ते बोिळज असा अर्धवर्तुळाकार खारबांध तयार करून उघाडय़ा बांधल्या होत्या. या उघाडय़ा अवघ्या तीन ते चार वर्षांतच पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्यानंतर शेतात खारेपाणी जाऊन भातशेतीचे नुकसान होऊ नये यासाठी येथील शेतकऱ्यांनी श्रमदान करून बांधांची िखडारे बुजविण्यासाठी सातत्याने येथील शेतकरी प्रयत्न करीत आहेत.
सातत्याने निर्माण होणाऱ्या अतिवृष्टीमुळे उघाडय़ा व बंधाऱ्यांची अवस्था बिकट होत आहे तर दुसरीकडे भरतीच्या लाटांच्या तडाख्याने नादुरुस्त झालेल्या बंधाऱ्यांना िखडार पडून नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी या भागातील बांधबंदिस्ती व उघाडय़ा कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
तसेच पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी बोिळज ते चिखलडोंगरे गावापर्यंत चार ते पाच उघाडय़ा, चिखल डोंगरे ते मारंबलपाडा जेट्टीपर्यंत दोन उघाडय़ा, मारंबळपाडा नारंगी भवानी मंदिरापर्यंत दोन उघाडय़ा नव्याने कार्यान्वित करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी खारभूमी विभागाकडे केली आहे. तसेच पावसाळय़ापूर्वी जे बांध नादुरुस्त आहेत तेसुद्धा पावसाळय़ापूर्वी दुरुस्त करण्यात यावे, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेकडो एकर भातशेती पाण्याखाली जाण्याची भीती
मारंबळपाडा यासह विविध ठिकाणच्या भागात शेतकरी भातशेती करीत आहेत. परंतु या भागातील बंधारे व उघाडय़ा नादुरुस्त झाल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी शेतात गेले तर या भागातील शेती नापीक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही खारभूमी विभाग या भागात लक्ष देत नसल्याने जर अतिवृष्टी झाली तर शेकडो एकर शेती ही पाण्याखाली जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे.
पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या उघाडय़ा जीर्ण अवस्थेत ; पावसाळय़ापूर्वी नवीन उघाडय़ा व जुन्या उघाडय़ा कार्यान्वित करण्याची मागणी
विरारजवळील नारंगी, चिखल डोंगरी, मारंबलपाडा, बोिळज येथील भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या उघाडय़ा या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 06-05-2022 at 00:01 IST
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Open dilapidated state drainage demand operation openings openings monsoon amy