लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेत आयुक्त संजय काटकर यांनी शुक्रवारी तब्बल २५३ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. यात सहायक आयुक्त, अभियांत्रिकी, लिपिक, शिक्षक ते शिपायांपर्यंत बदल्या करण्यात आल्या आहेत.

mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी
pune pmc On first day of Sarvankash Swachhta 24 tons of garbage and billboards removed
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला

प्रामुख्याने या बदली आदेशात प्रभाग स्तरावरील कामकाजात सूसुत्रता यावी म्हणून पाच सहाय्यक आयुक्ताच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात काही दिवसापूर्वीच प्रभाग क्रमांक ६ च्या प्रभाग अधिकारी पदाची जबाबदारी सोपवलेल्या नरेंद्र चव्हाण कडून हा विभाग काढून घेत त्यांना पुन्हा अतिक्रमण विभागात हलवण्यात आले आहे. तर मध्यंतरी चर्चेत आलेल्या प्रभाग अधिकारी जितेंद्र कांबळे यांना प्रभाग ३ येथून प्रभाग क्रमांक १ येथे पाठवण्यात आले आहे. याशिवाय प्रियंका भोसले यांना प्रभाग क्रमांक ५ आणि कांचन गायकवाड यांना प्रभाग क्रमांक सहा ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच स्वच्छतेच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर १५१ सफाई कर्मचाऱ्यांच्या व २२ मजुरांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-भाईंदर शहराला डेंगू-मलेरियाचा धोका; महिन्याभरात रुग्ण संख्या चारपट

अन्य बदल्या

सहाय्यक आयुक्त (५),
कार्यालयीन अधीक्षक (३),
वरिष्ठ लिपिक (५) ,
बालवाडी शिक्षिका (१४),
कनिष्ठ अभियंता (ठेका) (९) ,
शिपाई (४०),
सफाई कामगार (१५१),
रखवालदार (७)
मजूर (२२)

Story img Loader