वसई: महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सावरा यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाला असला तरी बविआचा बालेकिल्ला असलेल्या नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघातून मिळालेली मते या विजयात महत्वपूर्ण ठरली आहे. सावरा यांना नालासोपारा मतदारसंघातून ५७ हजार ५८ एवढी मोठी आघाडी मिळाली आहे. पालघर लोकसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली. महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सावरा यांनी महाविकास आघाडी आणि बविआ या दोन्ही पक्षांना धोबीपछाड मात केली आहे. डहाणू वगळता उर्वरित ५ मतदारसंघात सावरा यांनी आघाडी घेतली आहे. त्यामध्ये सर्वाधिक आघाडी ही नालासोपारा मतदारसंघातून मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Palghar Lok Sabha Constituency Review :वाढीव मतदानानंतर चुरस

पालघर मतदारसंघात एकूण ६ विघानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी ५ मतदारसंघातून सावरा यांनी आघाडी मिळवली आहे. नालासोपारा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे ५७ हजार ३५८ मतांची आघाडी सावरा यांना मिळाली. विक्रमगड (३२ हजार २०९)  पालघर (२९ हजार २३९)  बोईसर (३९ हजार १४८)  आणि वसई विधानसभेत( ९ हजार ४१९) मतांनी आघाडी मिळाली. डहाणू विधानसभा मतदारसंघात मात्र ८०० मतांची आघाडी महाविकास आघाडीच्या भारती कामडी यांना मिळाली. सावरा यांना नालासोपार्‍यातून सर्वाधिक आघाडी तसेच सर्वाधिक १ लाख ३६ हजार ८१८ मतं मिळाले आहे.

हेही वाचा >>> पालघर: रेल्वे दुरुस्तीचे काम पूर्ण, रेल्वे सेवा पूर्ववत

वसई, नालासोपार्‍यात आघाडी घेण्याची रणनिती यशस्वी नालासोपार्‍यात सर्वाधिक म्हणजे ५ लाख मतदार आहेत. नालासोपार, वसई हे मतदारसंघ बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला. या दोन मतदारसंघात बविआला रोखण्याची रणनिती भाजपाने आखली होती. त्यामुळे प्रचार करताना सुद्धा याच भागांवर प्रत्येक पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.मागील ३० वर्षांपासून या दोन्ही मतदार संघावर बहुजन विकास आघाडीची चांगली पकड आहे. त्यामुळे वसई विरार भागात बहुजन विकास आघाडीला चांगली मतं मिळतील असं वाटले होते. परंतु याच भागात भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची वसईत सभा झाली तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नालासोपाऱ्यात सभा झाली होती यांची सभेचा सुद्धा मोठा प्रभाव मतदारांवर पडला. वसई विधानसभा क्षेत्रातून महायुतीला ७६ हजार ३०७ तर नालासोपाऱ्यात १ लाख ३६ हजार ८१८ मतं मिळाली. या मतांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची मतं अधिकच निर्णायक ठरली असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.दोन्ही विधानसभा क्षेत्रात सवरा यांना ८० हजाराहून अधिकची आघाडी मिळाली आहे. त्यामुळेच पावणेदोन लाख मतांनी डॉ.सवरा यांचा विजय झाला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar lok sabha election result 2024 dr hemant savara leading in 5 assembly constituencies zws
Show comments