वसई- हिवाळा सुरू झाल्यापासून स्ट्रॉबेरीच्या विविध पदार्थांना मागणी वाढली आहे. स्ट्रॉबेरी सिझनच्या निमित्ताने बाजारात मोठ्या स्ट्रॉबेरीपासून बनवलेल्या शीतपेये, गोड पदार्थांची रेलचेल पाहायला मिळत आहे. कॅफे, बेकरी, रेस्त्राँ, छोट्या इटरीज सर्व ठिकाणी मेन्यू कार्डवर स्ट्रॉबेरीचे पदार्थांना मागणी वाढली आहे. खव्वय्यांचीही स्ट्रॉबेरीयुक्त खाद्यपदार्थांना पसंती मिळत आहे.
हिवाळ्यात बाजारात मुबलक प्रमाणात भाजीपाला, फळ येतात विशेष आकार्षण असते ते स्ट्रॉबेरीचे. स्ट्रॉबेरीचा मोसम सुरू होताच रेस्त्राँमध्ये स्ट्रॉबेरी मिल्क शेक, स्मुथी, आईस्क्रिम, फालुदा आदी मिळू लागते आहेत. त्यात भर पडली आहे ती कोरियन पद्धतीच्या स्ट्रॉबेरी बबल टी, बबल शेक, स्ट्रॉबेरी क्रथ विथ क्रीम, स्ट्रॉबेरी कोकोनट मिल्क, स्ट्रॉबेरी ॲलोव्हेरा ज्यूस, नॉन अल्कोहॉलिक बीअर, स्ट्रॉबेरी कॉकटेल मिक्स, मोइतो आदीं विविध पदार्थांची. बेकरी आणि कॅफेजमध्ये देखील शीतपेयांसह स्ट्रॉबेरीचे विविध गोड पदार्थ दिसू लागले आहेत. त्यात चॉकलेट स्ट्रॉबेरी बोल, स्ट्रॉबेरी ग्रॅनोला पार्फेट बेकफास्ट बोल, स्ट्रॉबेरी क्रीम, स्ट्रॉबेरी जिलातो, सोरबे, शॉर्ट केक, चीझकेक, पावलो, स्ट्रॉबेरी क्रश फील्ड क्रॉसों, शीट केक, निबल केक, पाऊंड केक स्मुथी बोल आदी परदेशी पदार्थ पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा >>> नालासोपाऱ्यातील कुख्यात गुंड राजकुमार गुप्ता स्थानबद्ध, तुळींज पोलिसांची कारवाई
विक्रीत २२ टक्क्यांनी वाढ
या पदार्थांच्या किंमती ३०० रुपयांपासून पुढे सुरू होतात. तर पेये दीडशे रुपयांपासून पुढे मिळतात. बोल्सचे प्रकार, केक आणि स्ट्रॉबेरी क्रीमयुक्त पदार्थ आदींना सर्वाधिक मागणी असून मागील वर्षींच्यापहिल्याच महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यंदा तब्बल २२ टक्क्यांनी खप वाढला आहे, फ्युअल अप क्लाउड कीचनचे व्यवस्थापक रमेश सारंगे यांनी सांगितले.
स्ट्रॉबेरीचे विविध प्रकार बनवण्याचे आणि खाण्याची संस्कृती अमेरिका, युरोपमध्ये आहे. तिथूनच बरेचसे गोडाचे पदार्थ आपल्याकडे आले असून सध्या कोरिअन पदार्थांचाही यात समावेश होत आहे. या नवीन पदार्थांना तरुणांकडून जास्त मागणी मिळते आहे, असे क्लाउड कीचन व्यवसाय सल्लागार पिंकी सावला यांनी सांगितले.
हेही वाचा >>> चंडिका देवी मंदिर उदवाहक दुर्घटनेप्रकरणी व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल
स्ट्रॉबेरी फ्लेवर केकना ग्राहकांची मोठी मागणी
पारंपरिक (ट्रेडिशनल) केक अर्थात स्पाँज केकच्या लेअरमध्ये क्रीम आणि वरुन डेकोरेशन यास ट्रेडिशनल किंवा रेग्युलर केक म्हणतात. या केकेमध्ये विविध फ्लेवर्स उपलब्ध आहेत त्यात सध्या ट्रेडिशनल केक विथ स्ट्रॉबेरी या केकना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चॉकलेट स्ट्रॉबेरी, बिसकॉफ स्ट्रॉबेरी, व्हॅनिला स्ट्रॉबेरी, मिक्स फ्रूट, गुलाबजाम स्ट्रॉबेरी असे केकचे फ्लेवर्स बेकरीजमध्ये उपलब्ध आहेत. यात चॉकलेट आणि बिसकॉफ फ्लेवर केकना ग्राहकांची मोठ्या प्रमाणत पसंती आहे. तसेच केक जारमध्ये ब्लूबेरी-स्ट्रॉबेरी, तिरामिसू स्ट्रॉबेरील मोठी मागणी मिळत आहे, असे स्विट काऊंटीच्या बोरिवली शाखेचे स्टोअर मॅनेजर प्रकाश नलावडे यांनी सांगितले.