वसई– मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजना पालघर जिल्ह्यात संथगतीने सुरू असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील ७७ हजार घरे मंजूर असली तरी केवळ साडेनऊ हजार घरेच तयार आहेत.

पंतप्रधान आवास योजना एकूण ४ घटकांमध्ये राबविण्यात येते. घटक ‘अ’ मध्ये झोपडपट्टी पुनर्विकास करणे, घटक ‘ब’ मध्ये कर्ज आणि व्याज अनुदान स्वरुपात घरांची निर्मिती करणे, घटक ‘क’ मध्ये खाजगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे. आणि घटक ‘डट मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घर बांधण्यासाठी अनुदान देणे अशा योजनांचा समावेश आहे. मात्र पालघर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान आवास योजना संथगतीने सुरू असल्याचे आढळून आले आहे.

Sachin | M| Maharashtra Sadan free for literary conference Nagpur news aharashtra Sadan free for literary conference Nagpur news साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत (लोकसत्ता टीम)Tendulkar and Raj Thackeray
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
CIDCO announced rates of 26 thousand houses in Navi Mumbai
परवडणारे घर ७४ लाखांचे! सिडकोच्या अल्प उत्पन्न घरांचे दर पाहून अर्जदार अवाक्
BDD chawl redevelopment, houses Worli ,
बीडीडी चाळ पुनर्विकास : वरळीतील ५५० घरांचा ताबा मार्चमध्ये, म्हाडाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात घरांच्या वितरणाचा समावेश
Shelu and Wangani housing project opposed by mill worker
वांगणीतील घरे नापसंत, प्रकल्प रद्द करण्याची गिरणी कामगारांच्या संघटनांची मागणी, तर शेलूतील घरांच्या किमती सहा लाख करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
residential housing market Mumbai , Knight Frank India,
मुंबई देशातील सर्वात मोठी निवासी घरांची बाजारपेठ! ‘नाइट फ्रँक इंडिया’चा अहवाल जाहीर
Loksatta shaharbaat Plight of railway passengers in suburban areas
शहरबात: रेल्वे प्रवासी उपेक्षित
Mumbai, MHADA , houses MHADA ,
मुंबई : पत्राचाळीत सर्वसामान्यांसाठी म्हाडाची आणखी १,४५६ घरे

हेही वाचा – शहरबात : मासेमारी बंदी कालावधी वाढीकडे वाटचाल

पालघर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेली घरे आणि प्रत्यक्षातील काम, आवश्यक निधी याबाबतचा तपशील खासदार हेमंत सावरा यांनी मागविल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २९ लाख ९५ हजार ४२८ आहे. जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा असे आठ तालुके आहेत. १००७ गावे आणि ४६७ ग्रामपंचायती या जिल्ह्यात आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यात ७७ हजार ६८ घरांचा प्रस्ताव होता. मात्र त्यातील ९ हजार ५५५ घरे पूर्ण झाली आहेत. अद्यापही ६७ हजार ५१३ लाभार्थी योजनेतील घरापासून वंचित आहेत. आदिवासी जिल्हा असूनही येथील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने शासकीय यंत्रणेची उदासीनता दिसून आली आहे.

पालघर जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे लागू नसल्याबद्दल खासदार डॉ हेमंत सवरा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी ८ तालुकानिहाय तपशील मागवला आहे. सावरा यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र पाठवून जिल्ह्यात योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी केली. सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणांची समन्वय बैठक घेऊन तालुकानिहाय अधिकाधिक निवासस्थाने कशी मंजूर करता येतील, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – १५ मच्छीमार संघटनांचा ‘वाढवण’ला पाठिंबा; बंदर समन्वय समिती बैठकीत सकारात्मक चर्चा

सुरक्षा सिटीत सोडत पद्धतीने घरे

वसईच्या स्मार्ट सिटी संकुलात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे देण्यासाठी सोडत योजना सुरू केली आहे. पात्र लाभार्थ्यांना अनुदानाअंतर्गत घरे देण्यासाठी सोडत काढली जाणार आहे, अशी माहिती सुरक्षा व्यवस्थापन सदस्य जश पंचमिया यांनी सांगितली.

Story img Loader