विरार : वसई-विरार परिसरात नववर्षांच्या सुरुवातीलाच मोठय़ा प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील पाच दिवसांत १७४१ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. पालिका प्रतिबंध क्षेत्र वाढवूनही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. यामुळे आता पोलिसांनीसुद्धा करोना संसर्ग रोखण्यासाठी पुढाकार घेत गृहसंकुलांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यात जर गर्दी केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शहरात वाढती रुग्णसंख्या पाहता पालिकेने नुकतेच शहरात निर्बंध लावले आहेत. असे असतानाही नागरिक करोना नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. अनेक सूचना देऊनही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने करोना प्रसाराची भीती वाढली आहे. त्यात दिवसेंदिवस रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जानेवारी महिन्यात गृहसंकुलात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले जात आहेत. त्यात पालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजत असल्याने अनेक गृहसंकुलात गर्दी होत आहे. यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी गृहसंकुलांना गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. जर गुहसंकुलात गर्दी केल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे.
या संदर्भात माहिती देताना परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी माहिती दिली की, वाढती रुग्णसंख्या धोकादायक आहे. नागरिकांनी करोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पण असे होत नसल्याने पोलिसांनी सर्व गृहसंकुलांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी सर्व गृहसंकुलांना सूचना देण्याचे काम सुरू आहे. समाजमाध्यमांचा वापर करून गृहसंकुलांना संदेश दिले जात आहेत. तसेच गर्दी अथवा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई केली आहे. असे कुणी केल्यास त्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. यावरून शाळेतील मुले आणि इतर अशी एकच गर्दी शाळेच्या आवारात उसळली. साधारण १५०० हून अधिक पालक, विद्यार्थी शाळेच्या बाहेर जमा झाले. त्यात नागरिकांना आवरणे कठीणाणार आहे. यावरून शाळेतील मुले आणि इतर अशी एकच गर्दी शाळेच्या आवारात उसळली. साधारण १५०० हून अधिक पालक, विद्यार्थी शाळेच्या बाहेर जमा झाले. त्यात नागरिकांना आवरणे कठीण.