वसई : महावितरणच्या भूमिगत वीज वाहिनीचा धक्का लागून मृत्यू पावेलल्या तनिष्का कांबळे प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र तिच्या कुटुंबीयांना अत्यंत असंवेदनशील वागणूक मिळत असल्याचा आरोप होत आहे. अर्नाळा सागरी पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना शवविच्छेदन अहवाल देण्यास नकार दिला असून काही राजकीय पक्षांनी कुटुंबीयांना तडजोडीचा सल्ला दिल्याचे कळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोळींज येथे राहणाऱ्या तनिष्का कांबळ या मुलीला १६ ऑगस्ट रोजी घराच्या खालीच असलेल्या भूमिगत वीज वाहिनीचा धक्का लागून त्यात तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी १५ दिवस उलटूनही गुन्हा दाखल झालेला नाही. दुसरीकडे मुलीच्या कुटुंबीयांची पोलिसांकडून फरफट सुरू आहे. अर्नाळा सागरी पोलिसांनी या मुलीच्या कुटुंबीयांना शवविच्छेदन अहवाल देण्यास नकार दिला आहे. ’आम्ही सोमवारी आगाशी आरोग्य केंद्रात   अहवाल घेण्यास गेलो असता दोन तास बसवून ठेवले आणि नंतर पोलिसांकडे जायला सांगितले. परंतु अर्नाळा सागरी पोलिसांनी आम्हाला शवविच्छेदन अहवाल देता येत नाही असे सांगून परत पाठवले’, असा आरोप पीडित मुलीचा भाऊ रोनक कांबळे यांनी केला आहे.  तेथील अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्राचे छायाचित्रही काढू दिले नाही, असाही आरोप त्यांनी केला. तसेच या प्रकरणी काही राजकीय पक्षांनी कुटुंबीयांना तडजोडीचा सल्ला दिल्याचे कळते. गुन्हा दाखल झाल्यास काहीच मिळणार नाही, त्याऐवजी तडजोडीचा मार्ग पत्करावा असे काही राजकीय नेत्यांनी सांगितले. तसेच अहवाल तयार करणाऱ्या अभियंत्याची पत्नी गर्भवती असल्याने अहवालाला उशीर होत आहे. त्यामुळे सांभाळून घ्या, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितल्याचा दावाही रोनक कांबळे यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा अहवाल मंगळवार उशिरापर्यंत अपेक्षित आहे. तो आल्यानंतर गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांनी दिली. पोलीस आणि महावितरण हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याने या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करम्णार असल्याची माहिती ग्रीन रिफ्लेक्शन ट्रस्टचे अध्यक्ष चरण भट यांनी दिली. या प्रकरणाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी या जनहित याचिकेद्वारे केली जाणार आहे

आमच्याकडे शवविच्छेदन अहवाल काल आलेला नव्हता. यानंतर कुटुंबीयांना मागणी केल्यास त्यांना शवविच्छेदन अहवाल देण्यात येईल. – राजू माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे</strong>

पीडित मुलीच्या कुटुंबीयांना शवविच्छेदन अहवाल नाकारणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवून कारवाई करण्यात येईल. – प्रशांत वाघुंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ- ३