वसई– विरार मध्ये महापालिकेच्या बनवाट बांधकाम परवागनी (सीसी) चा वापर करून अनधिकृत इमारती बांधल्याचे आणखी प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या प्रकरणात विकासकांवर फसवणुकीसह एमआरटीपीए अंतर्गत गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> नायगाव मध्ये ११ वर्षीय शाळकरी मुलाची आत्महत्या

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…

ऑगस्ट महिन्यात विरार पोलिसांनी ५५ अनधिकृत इमारतींचे प्रकरण उघडकीस आणले होते. त्यातील तपासात ११७ अनधिकृत इमारती असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणानंतर पालिकेची नामुष्की झाली होती. त्यामुळे पालिकेने शहरातील अनधिकृत इमारतींचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली होती. विरार मध्ये अशाच प्रकारे बनावट बांधकाम परवानगीचा (सीसी) वापर करून निवासी इमारत बांधल्याचे उधड झाले आहे. प्रभाग समिती ‘सी’ (चंदनसार) चे प्रभारी सहाय्यक आयुक्त अजय चौकेकर यांनी याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा >>> Navratri 2023: अर्नाळा किल्ला येथील प्राचीन कालीन कालिका माता मंदिर

मेसर्स सिध्दीविनायक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे किशोर पाटील यांनी २०१० पासून मौजे विरार सर्व्हे नंबर १६९, हिस्सा नंबर ९ येथे ‘साई स्वप्न’ अपार्टमेंट बिल्डिंग क्रमांक १ च्या  ए बी सी आणि डी अशा ४ विंग बनवाट बांधकाम परवानगी तयार करून बनविल्या आणि त्यातील सदनिका विक्री केली होती. २०१५ मध्ये मेसर्स वरद विनायक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स चे भागाीदरार ज्ञानेश्वर पाटील यांनी याच साई स्वप्नमध्ये दुसरी अनधिकृत इमारत तयार केली होती. २००९ मध्ये मेसर्स श्री कन्स्ट्रक्शन तर्फे धनेश पाटील यांनी विरार सर्वे नंबर १७५ हिस्सा नंबर ७ या जागेवर ‘साईराज अपार्टमेंट’ ही अनधिकृत इमारत बनाव बांधकाम परवानगी तयार करून बनवल्याचे निष्पन्न झाले आहे.

कुठला गुन्हा दाखल या तिन्ही प्रकरणा विरार पोलीस ठाण्यात विकासकांवर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना व नियोजन अधिनियम १९६६ च्या कलम ५२, ५३, ५४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.