वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काँक्रीटीकरणासह इतर कामे निकृष्ट असल्याचे नायगाव पोलिसांनी पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. दुभाजक नष्ट, उतारांचा अभाव, खडीचा वापर यामुळे पावसात पाणी साचून वाहतूक कोंडी आणि अपघात होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे काम सुरू असल्यापासून ३ महिन्यातच सुमारे ४० जणांचा अपघाची मृत्यू झाला आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटकरणाचे (व्हॉईट टॉपिंग) कामात नियोजनाचा अभाव तसेच काम निकृष्ट असल्याने महामार्गावर अपघात होत आहेत. जे काम पावसापूर्वी होणे अपेक्षित होते ते अद्याप झालेले नाही. जी कामे झाली आहेत ती अर्धवट आणि सदोष आहेत. यामुळे सतत वाहने घसरत असून अपघात होत आहेत. मार्च ते मे या कालावधीत सुमारे ४० जणांचे अपघाती मृत्यू झाले होते. अद्याप पावसाने जोर पकडलेला नाही. मात्र मुसळधार पाऊस सुरू होताच महामार्गा पाण्याखाली जाण्याचा धोका नायगाव पोलिसांनी वर्तवला आहे.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Vasai, authoritarianism,
शहरबात : एवढा माज येतो कुठून…?
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Schoolgirl revert cyber prankster money fraud
वसई : शाळकरी मुलीने उलटवला सायबर भामट्याचा डाव
success story Heartbroken lover become officer after his girlfriend reject him
VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”

आणखी वाचा-वसई : अखेर शिक्षिकेचा विनयभंग करणारा तलाठी निलंबित, संतप्त वसईकरांचे तहसीलदार कार्यालयावर आंदोलन

याबाबत नायगाव पोलिसांनी कुठे कुठे कामे निकृष्ट आणि सदोष आहेत, अपघात प्रवण तसेच पाणी साचण्याची ठिकाणी कुठली आहेत त्याचा अहवाल तयार करून तो महामार्गा प्राधिकरणाला सादर केला आहे. कशा प्रकारे वाहने घसरून अपघात होतात याची प्रत्यक्ष चित्रण देखील पोलिसांनी केले आहे. काँग्रसचे नेते विजय पाटील यांनी देखील महामार्गावरील सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट असल्याचा आरोप केला आहे. यामुळे अपघात होत असून नियोजनाचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकाराच्या कामाची गरज नसताना हे काम म्हणजे पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नायगाव पोलिसांनी केलेली पोलखोल

  • साधना हॉटेल समोर कोल्ही चिंचोटी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही मार्गिकमेधील दुभाजक १०० मीटर पर्यंत पूर्ण पणे सपाट झाले आहेत.
  • बापाणे पूलाच्या उतरणीला लागून दोन्ही मार्गिकेमधील दुभाजक बुजून गेले आहेत. त्यामुळे मुंबईकडून येणार्‍या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाल्यानंतर त्यावरील चालक विरूध्द दिशेने प्रवास करत असतात.
  • बापाणे पूलाजवळ मुंबई वाहिनीवरील सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम झाले आहे. मात्र या ठिकाणी खाली उतरण्यासाठी उतार नसल्याने दुचाकी घसरत आहेत.
  • मुंबई मार्गिकेवर बापाणे पूल उतरणीवरील डाब्या बाजून उतार तयार करताना साधी माती टाकण्यात आली आहे. त्यामुळे वाहने घसरण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पावसात पाणी साठणार आहे.
  • जय विजय इंडस्ट्रीज समोर महामार्गाखालून पाणी जाण्यासाठी अंडरपासचे काम चालू असल्याने डांबर टाकण्यात आले आहे. त्यामुळे वाहने अडकत आहेत. याशिवाय काम अपूर्ण असल्याने पावसाचे पाणी साचण्याची शक्यता आहे
  • वासमार्‍या पूलाखाली तसेच यादव हॉटेल समोर पावसाळ्यात सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे चिखल होत आहे. अंडरपासचे काम अपूर्ण आहे
  • हॉटेल सनसाईन समोर वॉटर अंडरपासचे काम अपूर्ण असून रोडवर कच्चे डांबर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे जड वाहने फसण्याची तसेच पाणी साचण्याची आणि अपघाताची शक्यता आहे.
  • मालजीपाडा उतरणीवर दोन्ही बाजूने काँक्रीटीकरमाचे काम झालेल्या ठिकाणी उतार नसून वाहने जास्त प्रमाणात घसरत आहेत. पूलाच्या खाली पाणी साचण्याची शक्यता असून या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होणार आहे.
  • ससूनवघर पूलावर काँक्रीटीकरणाचे सिमेंट, रेती पडली आहे. हे काम अद्याप सुरू आहे. या पुलाखाली पाणी साचण्याची शक्यता आहे.
  • नवीन फाऊंटन हॉटेल, जे.के. टायक कंपनी समोर वॉटर अंडरपासचे काम चालू असून कच्चे डांबर टाकलेले आहे. त्यामुळे वाहतूक समस्या, अपघात तसेच पाणी साचण्याची शक्यता आहे
  • हॉटेल मटका शेजारी पाणी साचण्याची दाट शक्यता असून वॉटर अंडरपासमधून पूर्ण पाणी जाणार नसल्याने या ठिकाणी पाणी साचून वाहतूक समस्या निर्माण होऊ शकते.
  • हॉटेल जलाराम व मालजीपाडा पुलाखाली पूर्ण डांबरीकरण खराब झाले असून सदर पाणीसाचून वाहतूक कोंडी आणि अपघात होऊ शकतो.

आणखी वाचा-वसई : पोलीस आयुक्तालयातील ५ पोलिसांना बढत्या

पावसाळ्यापूर्वीची काम पूर्ण केल्याचा दावा

पावसाळ्यापूर्वी महामार्गावरील नालेसफाई यासह कलव्हर्ट तयार, पाणी जाण्याचे मार्ग मोकळे करणे अशी कामे पूर्ण करण्यात आली असल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाने केला आहे.पावसाचे पडणारे पाणी महामार्गावर साचू नये यासाठी महामार्गावरील जूचंद्र येथे २, फाऊंटन जवळ १, सनशाईन १, सेल्फी धाब्याजवळ १ असे पाच बॉक्स कलव्हर्ट तयार करीत आहोत तीन झाले अजूनही दोन प्रगतीपथावर आहेत असे महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. याशिवाय काँक्रिटिकरणाचे काम आतापर्यंत ३५ टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ्यात काँक्रिटीकरण करणे शक्य होणार नाही. आता ज्या ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत ते काँक्रिटिकरण पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आल्याचे चिटणीस यांनी सांगितले.