वसई– विधानसभा निवडणुकीच्या आधी मुंबईत तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आलेल्या वसई आणि भाईंदरच्या ४ पोलीस अधिकार्‍यांची पुन्हा आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांची बदली करण्यास उशीर झाल्याने आता कुणाल्याच पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे मूळ जागेवर परतले पण पदच नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोगाने एकाच आयुक्तालयात दोन जिल्हे असतील आणि त्यातील ज्या पोलीस अधिकार्‍यांना ३ वर्षे पूर्ण झाली असतील अशा पोलिसांची बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तालयातील ३६ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या जागेवर मुंबईतून आलेल्या पोलीस निरीक्षकांना तात्पुरता पदभार देण्यात आला होता. निवडणुका संपल्याने पहिल्या टप्प्यात बदल्या होऊन गेलेल्या ३६ पैकी ७ पोलिसांना पुन्हा आयुक्तालयत बदली करण्यात आली होती. मंगळवारी पोलीस महासंचालक कार्यालयाने दुसर्‍या टप्प्यात ४ पोलीस अधिकार्‍यांची मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात बदली केली आहे. त्यात प्रफुल्ल वाघ, विजय पवार, राहुल पाटील, विवेक सोनावणे या ४ अधिकार्‍यांचा समावेश आहे. परंतु आता आयुक्तालयातील १८ पोलीस ठाण्यातील एकाही पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे पद रिक्त नाही. त्यामुळे या अधिकार्‍यांना मुख्यालयातील अन्य शाखेत (साईड ब्रांच) बसावे लागणार आहे.

जर आदेश लवकर काढले असते तर..

३१ डिसेंबर २०२४ रोजी बदल्या होऊन गेलेल्या ३६ पैकी ७ पोलिसांना पुन्हा आयुक्तालयत बदली करण्यात आली होती. यापैकी संजय हजारे यांची मांडवी येथे, राजेंद्र कांबळे यांची काशिमिर्‍यात तर जितेंद्र वनकोटी यांची पेल्हार पोलीस ठाण्यात पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. उर्वरित पोलीस अधिकारी प्रतीक्षा यादीत होते. त्यामुळे मुंबईतून आलेल्या ६ पोलीस निरीक्षकांना त्याच पोलीस ठाण्यात नियमित वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जर या पोलिसांच्या बदलीचे आदेश आधी निघाले असते तर त्यांना पोलीस ठाण्याचे प्रमुखपद मिळाले असते. आता बदली करून काय फायदा अशी खंत या अधिकार्‍यांनी व्यक्त केली.