पावणे तीन वर्षांत २७ हजार महिलांची प्रसूती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई: वसई-विरार महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या माता बाल संगोपन केंद्र व शासकीय रुग्णालय हे नागरिकांना फायदेशीर ठरू लागले आहेत. मागील पावणे तीन वर्षांत माता बाल संगोपन केंद्र व रुग्णालयात २७ हजार ८५६ इतक्या गर्भवती महिलांची प्रसूती झाली आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी या केंद्रांना चांगली पसंती दिली आहे.

वसई विरार माहापालीकेने गर्भवती महिला यांच्या प्रसूतीसाठी वसई विरार शहरात सातिवली, सर्वोदय, जुचंद्र अशा तीन ठिकाणी माता बाल संगोपन केंद्र  याशिवाय सर डी एम पेटिट, तुळींज रुग्णालय या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.   अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाहीत. त्यांच्यासाठी ही केंद्र वरदान ठरू लागली आहेत.  मागील पावणेतीन वर्षांत या  पाच केंद्राच्या ठिकाणी २७ हजार ८५६ इतक्या गर्भवती महिलांची प्रसूती झाली आहे. यात जूचंद्र येथे १ हजार ६८७, सर्वोदय वसाहत ११ हजार ७७१, सातीवली केंद्र ९ हजार ३९४, सर डीएम पेटिट रुग्णालय ४ हजार १४, तुळींज रुग्णालय ९९० अशा प्रसूती झाल्या आहेत. सर्वाधिक प्रसूती नालासोपारा येथील सर्वोदय केंद्रात झाले  आहे.  कुटुंब नियोजन विषयक शिबिराचे आयोजन, योग्य मार्गदर्शन,पोषण आहार, औषध उपचार अशा सर्व गोष्टीकडे लक्ष दिले जात आहे. याशिवाय एखाद्या बाळाला एनआयसीयूची गरज असेल तीसुद्धा सुविधा पालिकेच्या तीन ठिकाणच्या केंद्रात आहे. त्यामुळे गर्भवती महिला या बाल संगोपन केंद्रामध्ये तपासणी व प्रसूतीसाठी येत असल्याचे  डॉक्टरांनी सांगितले आहे.

ग्रामीण भागासाठी अधिक उपयुक्त

वसई महापालिकेच्या क्षेत्रात व पालिकेला लागूनच ग्रामीण परिसर आहे. त्याठिकाणी राहणारम्य़ा महिलांना प्रसुतीसाठी धावपळ करावी लागत होती. तर काही वेळा काही ठिकाणी घरगुती प्रसुती केली जात होती. आता वसई विरार शहरातील ठीक ठिकाणच्या भागात प्रसुतीसाठीची सुविधा उपलब्ध करून दिल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना ही या ठिकाणी येऊन उपचार घेणे अधिक सोयीचे ठरले आहे.

जूचंद्र येथील केंद्र पूर्ववत

वसई: करोनाचा वाढता संसर्ग व तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता  महापालिकेने जूचंद्र येथील माता-बालसंगोपन केंद्र करोनाबाधित गर्भवती महिलांच्या उपचारासाठी सुरू केले होते. मात्र आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मंगळवारपासून पुन्हा एकदा हे केंद्र पूर्ववत करण्यात आले आहे.

नायगाव पूर्वेतील जूचंद्र येथे महापालिकेचे माता-बालसंगोपन केंद्र आहे. या केंद्रात गर्भवती महिलांची तपासणी व प्रसूती केली जाते. मात्र डिसेंबरअखेर व जानेवारीच्या सुरुवातीला करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने  ज्या गर्भवती महिलांना करोनाची लागण झाली आहे वा करोना संसर्गाची लक्षणे असणाऱ्या महिलांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी पालिकेने सर्वसामान्य प्रसूतीसाठी असलेले जूचंद्र येथील माता-बालसंगोपन केंद्र बंद करून त्या ठिकाणी फक्त करोनाबाधित गर्भवती महिलांच्या उपचारासाठी हे केंद्र सुरू केले होते. त्यामुळे सर्वसामान्य महिलांच्या प्रसूतीसाठी पालिकेच्या सातिवली व तुिळज सर्वोदय येथील केंद्रात जावे लागत होते. मागील काही दिवसांपासून करोनासंसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.  सध्याच्या  स्थितीत या रुग्णालयात एकही गर्भवती महिला करोनाबाधित नसल्याने  हे रुग्णालय पालिकेने पुन्हा  गर्भवतींच्या तपासणी व प्रसूतीसाठी  पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.  हे रुग्णालय पूर्ववत करण्याच्या संदर्भात संबंधित विभागाला सूचना दिल्या असल्याची माहिती पालिकेच्या प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितली आहे.