वसई: सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी बसचालकांकडून अतिरिक्त प्रवासी भाडे आकारून आर्थिक लूट केली जाते. या आर्थिक लुटीला आळा घालण्यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त शाळांना सुट्टी असल्याने अनेक नागरिक आपल्या मूळ गावी जात असतात. वसई विरार शहरातूनही मोठय़ा संख्येने नागरिक हे मूळ गावी जातात; परंतु कधी कधी एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये व रेल्वेतील गर्दी, याशिवाय काही वेळा आरक्षण मिळत नाही. त्यामुळे खासगी बसेसने प्रवास करतात; परंतु खासगी ट्रॅव्हलचे मालक प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारणी करून लूट करीत असतात. याआधी अशा तक्रारी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्या आहेत. खासगी बसचालकांना एसटीच्या भाडेदरापेक्षा दीडपट भाडे जास्त आकारण्याची मुभा आहे. असे असतानाही त्याहीपेक्षा अधिकचे भाडे घेतले जाते. याशिवाय मनमानीही सुरूच असते.
खासगी बसचालकांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीला आळा; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाची विशेष तपासणी मोहीम
सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी बसचालकांकडून अतिरिक्त प्रवासी भाडे आकारून आर्थिक लूट केली जाते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-10-2022 at 00:02 IST
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prevent financial extortion private bus operators a special inspection drive of the transport department ysh