विरार : वसई, विरार शहरात वाढत्या घनकचऱ्याच्या समस्येने नव्या संकटला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील वाढत्या कचऱ्यावर कोणत्याही प्रक्रिया केली जात नसल्यामुळे तसेच सातत्याने कचऱ्याला लागणाऱ्या आगी आणि त्यातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचा परिणाम शहराला भोगावा लागत आहे.

सध्या जागतिक तापमान वाढीचा फटका संपूर्ण जगाला भेडसावत असताना वसई विरार शहरालासुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. शहरात मागील १३ वर्षांत कचराभूमीवर १४ लाख टन कचरा तयार झाला आहे. कचऱ्यातील सेंद्रिय पदार्थाचे विघटन होऊन तयार होणाऱ्या मिथेन वायूमुळे हा कचरा नेहमी पेटत असतो. पालिका अनेक वेळा त्यावर पाणी मारून विजविण्याचे प्रकार करते, मात्र हा कचरा तीस ते चाळीस फूट खोल असल्याने तळाशी ही आग सतत धुमसत राहते. हरितगृह वायू वातावरणातील ओझोन थराचा सातत्याने ऱ्हास करत आहेत.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष

यामुळे सूर्यापासून येणारी अतिघातक किरणे पृथ्वीच्या पुष्ठभागावरून उत्सर्जित होऊन ती वातावरणाच्या बाहेर न जाता वातावरणात राहत आहेत. यामुळे शहराचे तापमान वाढत आहे. त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर, वनजीवन वितरणावर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्याचबरोबर आम्लवर्षेचा धोकासुद्धा होऊ शकतो. यामुळे शहरातील इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, जलसाठे धोक्यात येऊ शकतात. एकूणच तापमानवाढीचा परिणाम मानवी अन्नसाखळीवर होण्याची शक्यता पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जोडीला वाढते औद्योगिकीकरण, कारखाने, वाहने तसेच नष्ट होणारी जंगले यांचासुध्दा मोठा वाटा या वायूच्या निर्मितीत आहे.

हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढत असल्याने ओझोन थर कमी होत चालला आहे.

यामुळे शहराचे तापमान अधिकाधिक उष्ण होत आहे. पालिकेने मागील १२ वर्षांपासून अनेक घनव्यवस्थापनासाठी वेगवेगळे प्रयत्न केले, पण सर्व प्रयत्न विफल झाले. शहरात दर दिवसाला ७०० टन कचरा निर्माण होत आहे. मात्र त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही, यामुळे दर दिवशी करचऱ्याचा डोंगर वाढतच चालला आहे.

या संदर्भात पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चारुशीला पंडित यांनी माहिती दिली की, पालिकेने घन कचऱ्याची समस्या पाहता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा काढली आहे. लवकरच ठेकेदार नेमून त्यावर काम सुरू केले जाईल.

परिणाम काय?

हवेतील पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि इतर वायूमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचे आणि वातावरणाचे तापमान वाढते त्याला हरितगृह परिणाम म्हणतात, तर या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. वातावरणाच्या थरांवर सूर्यकिरणे पडतात. वातावरणाचे थर सूर्यकिरणांना शोषून घेतात किंवा ते उत्सर्जित होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सूर्यकिरणे हरितगृह वायू शोषून घेतात किंवा पुन्हा उत्सर्जित करतात. याच सौरऊर्जेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापते. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान ३० अंशांनी कमी असले असते आणि जीवसृष्टीसाठी ते घातक ठरले असते.

हरितवायूंचा वाढता प्रभाव जगाच्या तापमानात बदल करत आहे. त्याचा फटका वसईकरांनासुद्धा सहन करावा लागणार आहे, पालिकेने  तातडीने शहरातील घन कचरा व्यवस्थापन करावे अन्यथा येणाऱ्या काळात त्याचे विपरीत परिणाम पाहायला मिळतील.

 –समीर वर्तक, पर्यावरण संवर्धन समिती, वसई

वातावरणातील तापमान

वायू तापमानवाढ (अंश)

पाण्याची वाफ           २०.६

कार्बन डायऑक्साइड       ७.२

ओझोन             २.४

डायनाट्रोजन ऑक्साइड    १.४

मिथेन              ०.८

इतर वायू              ०.६

एकूण सर्व एकत्रित

हरितवायू मिळून        ३३