लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : मिरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. यातील चौघांची बढतीने महाराष्ट्र सायबर विभागात बदली करण्यात आली आहे.

Vasai, authoritarianism,
शहरबात : एवढा माज येतो कुठून…?
Police Officers of Navi Mumbai marathi news
नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी राष्ट्रपती पोलीस पदकांनी सन्मानित
ghatkopar hoarding case
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद निलंबित
Schoolgirl revert cyber prankster money fraud
वसई : शाळकरी मुलीने उलटवला सायबर भामट्याचा डाव
policeman committed suicide by hanging himself in Virar
विरारमध्ये पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या
rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…
41 illegal buildings of Agrawal nagari
वसई: अग्रवाल नगरी मधील ४१ अनधिकृत इमारती पाडण्याचे न्यायालयाचे आदेश; पालिकेकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा, रहिवाशी हवालदील
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

पदोन्नतीच्या कोटयातील पोलीस निरीक्षकांची रिक्त पदे २५ एप्रिल २००४ ज्या स्थितीनुसार सेवाज्येष्ठतेने भरण्यात येतात. २०२०४ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना त्यांच्या मूळ सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस निरिक्षक पदावर बढती देण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार विभागीय पदोन्नती समितीने अशी बढती देण्यासाठी मागील वर्षी पात्रता तपासून निवडसूची तयार करण्यात आली होती.

आणखी वाचा-वसई : तलाठ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग, वसईत संतापाची लाट

या संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये याचिका दाखल होत्या. अखेर सरळसेवा भरती नियम आणि याचिकांच्या निर्णयानुसार मार्च महिन्यात समक्रमांकीत आदेश पारित करण्यात आले होते. त्यानुसरा मंगळवारी पोलीस आस्थापना मंडळाने महाराष्ट्र पोलीस अधिनिमय १९५१ मधील कलम २२ नुसार राज्यातील ४४९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पोलीस निरीक्षकपदी बढती देऊन बदली केली आहे.

या बढत्यांमध्ये मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ५ सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे. त्याना पोलीस निरीक्षक पदावर बढती देऊन बदली करण्यात आली आहे. आयुक्तालयातील कैलास टोकले (सायबर), शशिकांत अवघडे (सायबर) योगेश देशमुख (सायबर) रणजितसिंग परदेशी (सायबर) प्रवीण बनगोसावी तर नितिन फळफळे (राज्य गुन्हे वार्ता) विभागात बदली करण्यात आली आहे.