वसई : यावर्षीच्या रब्बी हंगामातील गुणकारी पांढरा कांदा तयार झाला आहे. या तयार झालेल्या पांढऱ्या कांद्याच्या माळी तयार करून शेतकरी आठवडी बाजार यासह अन्य भागात विक्रीसाठी जाऊ लागली आहे. सद्यस्थितीत या कांद्याना ही बाजारात चांगली मागणी वाढू लागली आहे.वसई तालुक्यातील विविध ठिकाणच्या भागात खरिपाचा हंगाम संपल्यानंतर रब्बी हंगामातील पिके घेतदोन ते अडीच किलो वजनाच्या  एका माळीमध्ये ३० ते ३५ कांदे असतात  तर  काही माळा  तीन  किलो पर्यंत कांद्याच्या आकारमानानुसार असतील जातात.

या रब्बी पिकांमध्ये गुणकारी असलेला पांढरा कांद्याचीही लागवड केली जाते. वसई तालुक्यातील करंजोण, जांभूळपाडा, तिल्हेर, आडणे, नवसई, भालीवली, मडकीपाडा, यासह इतर ठिकाणच्या भागात कांदा लावला जातो. पांढरा कांदा हा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने या कांद्याला बाजारात मोठी मागणी असते.  त्यामुळे रब्बीच्या हंगामात कांद्याचे उत्पादन अनेक शेतकरी घेतात. वसईत साधारणपणे दीडशेहून अधिक हेक्टर  क्षेत्रात कांदा लागवड करण्यात आली आहे.

आता लागवड केलेला कांदा हळूहळू तयार होऊ लागला आहे. तयार झालेल्या कांद्याच्या शेतकरी माळी विणल्या जात आहेत. आणि त्या माळी विक्रीसाठी बाजारात आणू लागले आहे. उत्पादन खर्च व वाढती महागाई यामुळे कांद्याची माळेची  किंमत ही वाढली आहे. प्रतिमाळ ही ८० ते १०० रुपये या दरम्यान विकली जात आहे. एका माळी मध्ये साधारणपणे ३० ते ३५ कांदे गुंफलेले असतात त्याचे वजन दोन ते अडीच किलो पर्यंत भरते असे कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

कांदा आता तयार झाला आहे. त्यामुळे त्याची आवक थोडी बाजारात कमी आहे. त्यामुळे त्याला चांगला भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जसा कांद्याची आवक वाढेल तसे थोडे फार दर सुद्धा कमी होतील.एक एकरी लागवडीतून लाखभर  रुपयाचे उत्पन्न येते असे शेतकरी  विक्रेत्यांनी सांगितले आहे.

कांदा विक्रीला आठवडी बाजाराचा आधार

वसईच्या जूचंद्र, मांडवी, विरार, पापडी, नायगाव, आगाशी, विरार, चंदनसार, कामण यासह विविध ठिकाणी आठवडे बाजाराची परंपरा कायम असून आजही मोठ्या संख्येने मध्यमवर्गीय नागरिक या ठिकाणी खरेदी साठी जात असतात. विशेषतः शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेत मालाला याच आठवडी बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन हे शेतकरी आपल्या मालाची विक्री करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

खरेदीसाठी ग्राहकांची लगबग 

आठवडे बाजारात हे कांदे खरेदी करण्या साठी बोरिवली ,एक्सर ,भाईंदर ,मीरा रोड ,घोडबंदर,नायगाव , वसई , विरार व नालासोपारा येथील ग्राहक येतात. कांद्याच्या तयार माळा मिळत असल्याने खरेदी केलेले कांदे साठवणीसाठी घरातील उंच ठिकाणी बांबू वर टांगून ठेवतात. त्यामुळे हवेत  मोकळे राहिल्याने कांदे  जास्त काळ टिकतात. तसेच हा कांदा आरोग्यासाठी गुणकारी असल्याने जेवणाच्या सोबत याचा अधिक वापर होतो.