वसई : Maharashtra Weather Forecast वसई, विरार शहरात पावसाची सुरू असलेली संततधार शुक्रवारी सकाळी थांबली तरी शहरातील पाण्याचा निचरा झालेला नाही. जागोजागी नागरिक अडकून पडले आहेत. पालिकेने पंपाद्वारे पाणी उपसा करण्याचे ठरवले असले तरी पाणी टाकायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वसई पश्चिमेच्या अंबाडी रोड येथील पंचवटी नाक्यापासून अक्षय हॉटेलपर्यंतचा परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. परिसरात ५० हून अधिक इमारती असून त्या पाण्याखाली आहे. इमारतींच्या तळमजल्यावर पाणी शिरले आहे.  लोकांना बाहेर देखील पडता येत नाही. येथील सी कॉलनी परिसर  संपूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पाणी आमच्या इमारतीत शिरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही घराबाहेर देखील निघू शकत नाही, असे येथील रहिवाशी अनिल गुरव यांनी सांगितले. गुरूवार सकाळी १० पासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. शुक्रवार संध्याकाळी ५ पर्यंत वीजपुरवठा सुरळीत नव्हता. वीज नसल्याने इमारतीच्या टाकीत पाणी चढवता आलेले नाही.   हीच परिस्थिती वसई पश्चिमेच्या दिवाणमान, डीजी नगर, चुळणे गाव आदी परिसरात आहे.पाणी भरल्याने रिक्षा वाहतूक ठप्प झालेली आहे. जीवनावश्यक सामान घेण्यासाठी देखील नागिरकांना बाहेर पडणे कठिण  आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टय़ा असल्या तरी अनेकांना कामावर जाता आलेले नाही. मागील दोन दिवसात ४२१ मिली मीटर पाऊस पडला आहे.

शहरातील ४४ प्रमुख ठिकाणे जलमय

नालासोपारा येथील सेंट्रा पार्क, विरारमधील कातकरी पाडा, नालासोपारा पूर्वेच्या तुळींज रोड, गालानगर, रेल्वेस्थानक परिसर, अलकापुरी, कॅपिटॉल मॉल, निळेगाव, रेल्वे यार्ड रोड, हनुमान नगर, बुर्म्हान चौक, गास टाकी रोड, नालासोपारा पीएससी वॉर्ड परिसर, वसईतील गाडगेबाबा, तांडा, हनुमान गल्ली, तुळजाभवानी मंदिर परिसर, सनसिटी, भोयदापाडा, गोलाना नाका, सातिवली, अग्रवाल परिसर, परेरानगर, गावराई पाडा, डीजी नगर, ओमनगर, दिनदयाळ, सी आणि एच कॉलनी, गिरीज टोकपाडा, उमेळा सकाईनगर, गिरिज बाभोळा आदी परिसरात पाणी साचून राहिलेले आहे. पालिकेने ४४ ठिकाणी पाणी उपशा करण्यासाठी पंपाची व्यवस्था केलेली आहे. मात्र पाणी टाकायचे कुठे असा प्रश्न आहे.