लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसई: वसई तालुक्यातील जूचंद्र येथील कलाकार संजय पाटील याने भारताचे प्रतिनिधित्व करीत स्पेन येथे भौमितिक रांगोळी साकारली आहे. या रांगोळीत नुकताच यशस्वी झालेल्या चंद्रयान ३ मोहीम याचे चित्रण साकारल्याने भारताची ही रांगोळी अधिकच लक्षवेधी ठरली आहे.
नुकताच स्पेन येथे आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचे ( इंटरनॅशनल आर्ट फेस्टिव्हल) चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवासाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रांगोळी कलाकार संजय पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. या महोत्सवात इतर १३ देशातील कलाकारही सहभागी झाले होते. संजय यांनी नुकताच भारताच्या यशस्वी झालेल्या चंद्रयान ३ या मोहिमेचे चित्रण असलेली १० बाय १० फुटांची सुबक अशी भौमितिक रांगोळी साकारली होती. रांगोळीत असलेले चित्र, रंग छटा, रंग संगती यामुळे ही रांगोळी विशेष लक्षवेधी ठरली आहे. या कौतुकास्पद कामगिरीकरिता त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
आणखी वाचा-वसई: तानसा खाडीत महिला बुडाली; अग्निशमन दलाकडून शोध सुरू
जूचंद्र गाव हे रांगोळीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते येथील कला सातासमुद्रापार पोहचली आहे. संजय पाटील यांनी मागील सात ते आठ वर्षांपासून रंगसंगतीतून रांगोळीतील वेगळेपण तयार करीत भौमितिक रांगोळी, थ्री डी रांगोळी हे प्रकार उदयास आणले आहेत. त्यामुळे त्यांनी साकारलेली भौमितिक रांगोळी अधिकच आकर्षक व लक्षवेधी ठरत आहे. या मिळालेल्या यशाबद्दल संजय याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.